माहेरहून दहा लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेला ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:31 IST2021-02-25T04:31:50+5:302021-02-25T04:31:50+5:30

शहापूर : व्यवसायासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये आणि घटस्फोट दे, या कारणासाठी पत्नीचा शारीरिक, मानसिक छळ करून ...

Attempt to kill a married woman to fetch Rs 10 lakh from Maher | माहेरहून दहा लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेला ठार मारण्याचा प्रयत्न

माहेरहून दहा लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेला ठार मारण्याचा प्रयत्न

शहापूर : व्यवसायासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये आणि घटस्फोट दे, या कारणासाठी पत्नीचा शारीरिक, मानसिक छळ करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. विनय सत्यनारायण राठी (रा. शहापूर) असे अटक केलेल्याचे नाव असून, त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबतची तक्रार मयुरी विनय राठी (वय २७) यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, ‘लग्नात सांसारिक साहित्य आणले नाहीस, आता व्यवसायासाठी दहा लाख रुपये आण’, असे म्हणून विनय हा मयुरी यांना शारीरिक व मानसिक त्रास देत मारहाण करत होता. तसेच ‘संजय तेलनाडे याचा मी उजवा हात असून, पैसे दिले नाहीस तर वडिलांना जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी देत होता. घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही केली नाही म्हणून त्याने पत्नीचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्नही केला. दरम्यान, १५ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी विनय याने मयुरी हिला वकील पवनकुमार उपाध्ये यांच्या कार्यालयाजवळ नेत तेथे ‘घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या कर नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही’, असे म्हणून ढकलून देत शिवीगाळ करत मारहाण केल्याचे मयुरी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Attempt to kill a married woman to fetch Rs 10 lakh from Maher