शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

आष्ट्यात जातपंचायतीच्या प्रमुखावर गुन्हा दाखल

By admin | Updated: December 19, 2014 23:50 IST

बलात्काराच्या प्रयत्नाची फिर्याद : जातीतून बहिष्कृत करण्याची धमकी

आष्टा : आष्टा येथील कोल्हाटी समाज जातपंचायतीचे पाटील दिलीप यशवंत जावळे व अन्य १५ जणांनी एका अल्पवयीन मुलीचा इस्लामपूर येथील तरुणाशी परस्परच विवाह ठरविला. संबंधित मुलीच्या आईने या विवाहास विरोध केल्यानंतर त्यांनी समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी देत मुलीच्या आईकडे दंडाची मागणी केली. यावेळी बलात्काराचा प्रयत्न केल्याची फिर्याद मुलीच्या आईने शुक्रवारी आष्टा पोलिसांत दिली आहे. यानंतर जावळे व अन्य पंधरा जणांवर सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आष्टा येथील कोल्हाटी समाजातील एका लहान मुलीच्या विवाहासंदर्भात जातपंचायतीचे पाटील दिलीप जावळे, वसंत जावळे, अशोक जावळे, विजय जावळे (रा. महादेवनगर, इस्लामपूर), सदू मोरे, रंजना मोरे, विश्वास जावळे, संदीपजावळे, दिनकर सदू मोरे (सर्व रा. आष्टा) हे दि. १० नोव्हेंबर रोजी संबंधित मुलीच्या घरी आले. ‘आम्ही मुलीचा विवाह इस्लामपूर येथील किरण जावळे याच्याशी ठरविला आहे’, असे आईला सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईने, ‘मुलगी लहान असून मुलगा व्यसनी असल्याने विवाहास विरोध केला. त्यानंतर ‘समाजातून बहिष्कृत करु, मुलीचा विवाह होऊ देणार नाही’, अशी धमकी देऊन ते सर्व निघून गेले. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी मुलीची आई व इतर लोक इस्लामपूरला दिलीप जावळे यांच्याकडे गेले. तिथे जावळे यांनी सर्वांना शिवीगाळ करीत जातीतून बहिष्कृत केले व जातीत यायचे असेल तर २० हजार रुपये द्या, असे सांगितले. यावर मुलीच्या आईने, पैसे नसल्याने नंतर देतो असे सांगून त्या आष्ट्यात आल्या. बुधवार दि. १० डिसेंबर रोजी पंचायतीचे पाटील व इतर लोक आष्टा येथे आले व त्यांनी २० हजारांची मागणी केली. संबंधित महिलेने दंड म्हणून १० हजार रुपये दिले व उर्वरित रक्कम नंतर देतो असे म्हणताच, दिलीप जावळे याने या महिलेचा हात धरला व अंधारात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा केल्यानंतर दिलीप जावळे व इतर सर्व लोक पळून गेले. मनात भीती निर्माण झाल्याने संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दिली नाही. आष्टा येथील समाजाच्या सर्व महिला व इतरांनी धीर दिल्यानंतर त्यांनी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)