शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ड्रेनेजचा प्रश्न मागी

By admin | Updated: January 20, 2015 00:52 IST

कोल्हापूर महानगरपालिका : ताफ्यात ट्रक माऊटिंग जेटिंग मशीन दाखल

कोल्हापूर : शहरातील ड्रेनेजलाईन बंद होऊन मैला रस्त्यावर वाहण्याच्या समस्येपासून आता शहरवासीयांची सुटका होणार आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या ताफ्यात आज, सोमवारपासून ४० लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक ट्रक माऊटिंग जेटिंग मशीन दाखल झाले. महापौर तृप्ती माळवी यांच्या हस्ते सायंकाळी विठ्ठल रामजी चौकात मशीनचे पूजन करण्यात आले.शहरातील अनेक ड्रेनेजलाईन या ५० वर्षांपेक्षा अधिक जुन्या आहेत. तसेच नव्याने ७२ किलोमीटरची लाईन टाक ण्यात आली आहे. ३० वर्षांपूर्वीची लोकसंख्येची क्षमता असणारी शहरातील जुनी ड्रेनेजलाईन अडथळ्यांमुळे बंद पडण्याचे प्रमाण अधिक आहे. महापालिकेकडे असणाऱ्या तीन हजार लिटर क्षमतेच्या मशीनद्वारे तसेच कर्मचारी हाताच्या साहाय्यानेच सळी ढकलून ड्रेनेजलाईनची स्वच्छता करतात. कर्मचाऱ्यांचा तुटवडा व मानवी कार्यक्षमतेवरील मर्यादा, यामुळे वारंवार ड्रेनेजलाईन चोक-अप होऊन रस्त्यांवर मैला वाहण्याचे प्रमाण अधिक होते. तुंबलेल्या ड्रेनेजलाईनमुळे प्रशासन व नगरसेवकांत हमरीतुमरीचे प्रसंग नेहमी घडत होते.महापालिकेने नव्याने घेतलेल्या जेटिंग मशीनची क्षमता आठ हजार लिटरची आहे. टाटा चेसिसवर बसविण्यात आलेले हे मशीन अत्याधुनिक पद्धतीने उच्च दाब निर्माण करून पाईपलाईन स्वच्छ करते. अंतर्गत पाईप स्वच्छ करण्यासाठी या मशीनचा मोठा उपयोग होणार आहे. जेटिंग मशीनच्या पूजनप्रसंगी स्थायी समिती सभापती आदिल फरास, प्राथमिक शिक्षक मंडळ सभापती संजय मोहिते, नगरसेवक निशिकांत मेथे, डॉ. संदीप नेजदार, महेश जाधव, जालंधर पवार, महेश जाधव, राजू पसारे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)