शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य पर्यवेक्षकास लाच घेताना अटक

By admin | Updated: December 5, 2014 00:37 IST

जिल्हा परिषदेत कारवाई : नाहरकत प्रमाणपत्रासाठी मागितली रक्कम

सांगली : आरोग्य विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी चार हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षकास रंगेहात पकडण्यात आले. आयुब उमर शेख (वय ५४, रा. बोलवाड, टाकळी, ता. मिरज) याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेत आज, गुरुवारी दुपारी ही कारवाई केली. तक्रारदार हे ग्रामीण भागात राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी प्लॉट खरेदी केला आहे. तिथे त्यांनी घराच्या बांधकामाचे नियोजन केले. त्यांना हा प्लॉट एन.ए. (अकृषिक) करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा ना-हरकत दाखला पाहिजे होता. यासाठी त्यांनी या विभागाकडे अर्ज केला. प्रमाणपत्र देण्याचे काम शेख याच्याकडे असते. त्याने दाखला देण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी केली. रक्कम दिल्याशिवाय प्रमाणपत्र देणार नाही, असे त्याने सांगितले होते. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. या विभागाने लावलेल्या सापळ्यानुसार तक्रारदाराने शेख यांना आज, गुरुवारी दुपारी लाच देण्याचे मान्य केले होते. तत्पूर्वी लाचलुचपत पथकाने सापळा लावला होता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराकडून चार हजाराची लाच घेताना शेखला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईने जिल्हा परिषदेत खळबळ माजली. याबाबत विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेखला शुक्रवार न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)संपर्क साधा : आफळेलाचलुचपतचे पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे म्हणाले, कोणत्याही शासकीय अधिकारी व अथवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. संबंधितावर कारवाई केली जाईल.