शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील उद्धवसेनेच्या पदाधिकारी नियुक्त्यांना स्थगिती, विनायक राऊत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:20 IST

जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी बुधवारी केलेल्या नियुक्त्यांना २४ तासांच्या आता पक्षाकडूनच तडकाफडकी स्थगिती

कोल्हापूर : उद्धवसेनेच्या नऊ पदाधिकाऱ्यांच्या जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी बुधवारी केलेल्या नियुक्त्यांना २४ तासांच्या आता पक्षाकडूनच तडकाफडकी स्थगिती देण्यात आली आहे. उद्धवसेनेचे नेते, सचिव माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आपल्या लेटरपॅडवरून कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नऊ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या बुधवारी जाहीर केल्या होत्या. यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. परंतु, या नियुक्तीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांनी अन्य पदाधिकाऱ्यांकडे चौकशी केली. 

यानंतर गुरुवारी संध्याकाळी विनायक राऊत यांनी वरील पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. यामध्ये म्हटले आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील उद्धवसेनेच्या जाहीर झालेल्या सर्व पदांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने स्थगिती देण्यात आली आहे. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून हे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले.

उद्धवसेनेत गोंधळ

उद्धवसेनेतील नियुक्त्या जाहीर करण्याची वेगळी पद्धत आहे. त्यांच्या वृत्तपत्रातूनच ही नावे जाहीर करण्यात येतात. परंतु, कोल्हापूरच्या दोन विधानसभा मतदारसंघातील या नियुक्त्या जिल्हाप्रमुखांनीच जाहीर केल्याने उद्धवसेनेतही गुरुवारी गोंधळ उडाला. सकाळी सकाळीच अनेकांनी एकमेकांना फोन करून याबाबत विचारणा केली. दरम्यान, संध्याकाळी या पदांना स्थगितीही देण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Uddhav Sena Appointments Suspended; Vinayak Raut Announces

Web Summary : Uddhav Sena's Kolhapur appointments faced immediate suspension after announcement. Vinayak Raut cited party leader Uddhav Thackeray's order. Internal confusion arose due to differing announcement methods by district leaders.