शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
9
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
10
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
11
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
12
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
13
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
14
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
15
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
16
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
17
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
18
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
19
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
20
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
Daily Top 2Weekly Top 5

तावडे हॉटेलप्रकरणी अवमान याचिका

By admin | Updated: January 10, 2015 00:43 IST

स्थायी बैठकीत निर्णय : उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करुन बांधकामे

कोल्हापूर : तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत उच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ आदेश दिले आहेत. मात्र, याठिकाणी आदेशांचे उल्लंघन करून व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने थाटली आहेत. त्यामुळे महापालिकेतर्फे बुधवारी (दि. १४) उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय आज, शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती आदिल फरास होते.तावडे हॉटेल प्रकरणी अधिकाऱ्यांचे संगनमत आहे; त्यामुळे अतिक्रमणाच्या कारवाईतून मोठे मिळकतधारक वाचले. त्यावेळी झालेली टंकलेखनातील चूक आता तरी सुधारली आहे का? असा सवाल उपस्थित करून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मिळकतधारकांना नोटिसा पाठविल्या आहेत, अशी उत्तरे देण्याचा अधिकाऱ्यांनी प्रयत्न करताच अशी छापील उत्तरे किती दिवस देणार आहात? असा जाब सदस्यांनी विचारला. अधिकारी नगरसेवकांच्या तोंडाला पाने पुसत असून मिळकतधारक व महापालिका अधिकारी यांचे संगनमत असल्याचा थेट आरोप बैठकीत सदस्यांनी केला. न्यायालयाने आदेश देऊनही बांधकाम होत असेल तर तातडीने न्यायालयात जाऊन अवमान याचिका दाखल करण्याची मागणी सदस्यांनी केली.
यासंबंधीच्या न्यायालयीन कामकाजास महापालिकेचे वकील जाणीवपूर्वक गैरहजर राहतात, असाही आक्षेपही सदस्यांनी नोंदविला. वकिलांच्या गैरहजर राहण्यावरही शंका येऊ लागली असून, ते का गैरहजर राहतात याची चौकशी करण्याची मागणीही सदस्यांनी केली.

बैठकीतील चर्चा
पात्र सफाई कर्मचाऱ्यांना राजीव आवास योजनेतील घरे देण्याची प्रक्रिया सुरू असून, उपलब्धतेनुसार ४० कर्मचाऱ्यांना घरे देण्यात आली आहेत, केएमटीच्या नवीन बसची तिसरी चाचणी पुढील आठवड्यात होणार आहे, एनसीसी ते मोरेवाडी जकात नाक्यापर्यंतच्या रस्त्याचे काम दोन दिवसांत सुरू होणार आहे, तसेच रंकाळा प्रदूषण मुक्तीबाबत पुढील बैठकीत अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर दिली.