शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा मोगणे, मयूर स्पोर्टस् अंतिम फेरीत

By admin | Updated: January 10, 2015 00:19 IST

संजय देसाई स्मृती चषक

कोल्हापूर : अण्णा मोगणे सहारा स्पोर्टस्ने युनायटेड स्पोर्टस्चा पराभव करीत, तर मयूर स्पोर्टस्ने फायटर्स स्पोर्टस्चा पराभव करीत कै. प्रा. संजय देसाई स्मृती टी-२० चषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
शाहूपुरी जिमखाना येथे आज, शुक्रवारी सकाळच्या सत्रातील पहिला सामना अण्णा मोगणे सहारा विरुद्ध युनायटेड स्पोर्टस् यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना अण्णा मोगणे सहारा संघाने १७ षटकांत ७ बाद १६९ धावांचे आव्हान युनायटेड स्पोर्टस् संघासमोर ठेवले. मोगणे संघाकडून युवराज यवलूस्करने ३३ धावा, तर सूरज शिंदे याने १७ चेंडूंत ३७ धावा केल्या. युनायटेडकडून सागर मेतकेने तीन, तर योगेश कळंत्रेने दोन बळी घेतले.
उत्तरादाखल खेळताना फलंदाजीस आलेल्या युनायटेड संघाला हे आव्हान पेलवले नाही. मोगणे संघाच्या महेश पाटीलच्या भेदक गोलंदाजीसमोर युनायटेडचा निम्मा संघ गारद झाला. महेशला विकास जाधव व अतीश वरपे यांनी प्रत्येकी दोन बळी घेत मोलाची साथ देत युनायटेडला १७ षटकांत सर्वबाद १२५ धावांतच गारद करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
दुसरा सामना मयूर स्पोर्टस् विरुद्ध फायटर्स स्पोर्टस् यांच्यात झाला. मयूर स्पोर्टस्ने प्रथम फलंदाजी करताना १७ षटकांत ६ बाद १६४ धावा केल्या. यामध्ये अमोल निळुगडेने ३३ धावा, तर वैभव पाटील याने नाबाद २६ धावा केल्या. फायटर्सकडून आसिमपीर मुजावर यांने चार बळी घेतले.
उत्तरादाखल फलंदाजीस आलेल्या फायटर्स संघाच्या फलंदाजांचा कणा मयूर संघाच्या अमोल निळुगडे, नजीर शेख, प्रसाद पाटील, संदीप साळोखे यांनी मोडला. त्यामुळे १५ षटकांत १०९ धावांत फायटर्सचा संघ गारद झाला. यामध्ये विशाल कुकडे याने ३० धावा करीत एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भेदक गोलंदाजीपुढे फायटर्सचा टिकाव लागला नाही.
अखेर सामना ५५ धावांनी जिंकत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत मयूर संघाची गाठ अण्णा मोगणे संघाशी पडणार आहे.