शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई विकास आराखडा शासनास पाठविणार

By admin | Updated: April 11, 2015 00:09 IST

मंदिर परिसर विकासाचा २५५ कोटींचा प्रारूप आराखडा तयार

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसर विकास प्रकल्पाचा नव्याने केलेला २५५ कोटींचा प्रारूप आराखडा २० एप्रिलला होणाऱ्या महापालिकेच्या मंजुरीनंतर राज्य शासनास सादर केला जाणार आहे. याशिवाय सभेत झोन बदल, राजाराम कारखाना जागेवर बगीचा आरक्षण आदी विषयांवर चर्चा होणार आहे. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराचा विकास २५५कोटी रुपये खर्चून तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात फक्त मंदिर आणि बाह्ण परिसराच्या विकास केला जाणार आहे, ज्यात मंदिराच्या वास्तूचे जतन, संवर्धन, दर्शनमंडप, मंदिर बाह्ण ३० ते ४० मीटर परिसरातील भूसंपादन व नागरिकांचे पूनर्वसन, भक्तनिवास, प्रसादालय, पार्किंगचा समावेश असेल. आराखड्याचा दुसरा टप्पा धार्मिक स्थळांचे विशेषत: कोल्हापुरातील नवदुर्गा मंदिरांचा विकास, रंकाळा, पंचगंगा घाट, मंदिराशी जोडणारे रस्ते यावर आधारित आहे. हा प्रारूप आराखडा महासभेच्या मंजुरीने राज्य शासनास पाठविला जाणार आहे.प्राथमिक शाळेचे आरक्षण असलेल्या रि.स.नं. १७५/१अ पैकी ८७६ चौरस मीटर जागा खरेदी सूचना देणे, ‘राजाराम’च्या जागेवर बगीचा आरक्षण टाकणे,रि.स.नं. ५४६ येथील खुली जागा हिरव्या पट्ट्यातून रहिवाशी जागेत बदल करणे, स्टर्लिंग टॉवर ते बागल चौकपर्यंत १२ मीटर रस्त्यासाठी भूसंपादन करणे, आदी विषय सभेपुढे चर्चेसाठी येत आहेत. (प्रतिनिधी)मंदिर परिसर विकासाचा २५५ कोटींचा प्रारूप आराखडा तयार२० एप्रिलच्या मनपाच्या सभेत होणार मंजूरझोन बदलासह राजाराम कारखान्याचा विषय पुन्हा चर्चेसाठी५महापौर माळवी यांच्या विरोधात सभागृहात बहिष्कार टाकण्याचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादीने घेतला आहे. त्यामध्ये शिथीलता आणत, अर्थसंकल्प व माळवी यांच्या विरोधातील ठरावासाठी बोलावलेल्या सभेला नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता २० एप्रिलला होणाऱ्या सभेला सत्ताधारी उपस्थित राहणार की पुन्हा बहिष्कार टाकणार, याबाबत मनपा वर्तुळात उत्सुकता आहे.माळवी यांनी अद्याप अर्थसंकल्प मंजुरी व त्यांच्या विरोधातील ठरावावर स्वाक्षरी केलेली नाही. येत्या २० एप्रिलच्या सभेपूर्वी त्यांची स्वाक्षरी होणे अपेक्षित आहे. माळवी या ठरावावर १७ एप्रिलच्या दरम्यान स्वाक्षरी करणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.