शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील अंबाबाई देवीच्या खजिन्यात घसघशीत वाढ, गेल्या तीन वर्षात किती कोटींची पडली भर.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 16:52 IST

मागीलवर्षी रक्कम कमी कशी?

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईने माझे चांगले केले, देवीने माझी झोळी भरली..तर त्यातील मूठभर देवीच्या चरणी वाहण्याची भावना वाढीस लागली आहे. त्यातूनच अंबाबाईच्या खजिन्यात गेल्या तीन वर्षात ३५ कोटी १८ लाख ३४ हजार इतक्या उत्पन्नाची भर पडली आहे. यामध्ये सर्वाधिक रक्कम मागील वर्षी सन २०२३-२४ मध्ये आली आहे.श्री अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ गेल्या दहा वर्षात वाढला असून वर्षाला सरासरी ३० लाखांवर भाविक मंदिराला भेट देतात. देवीला नवस बोलण्याची प्रथा नाही. परंतु भक्तगण येताना कधीच रिकाम्या हाताने येत नाही. आई अंबाबाईच्या कृपेने आयुष्यात सगळे चांगले घडले म्हणून स्वखुशीने देवीची ओटी भरण्याची भावना असते. त्यातूनच सोन्या-नाण्यापासून अनेक वस्तूंचे भाविक दान करतात. त्यामुळे देवीच्या खजिन्यात येणाऱ्या देणगीच्या रकमेतही घसघशीत वाढ झाली आहे. वर्षागणिक हा आकडा वाढत असून मागील तीन वर्षात तो कमी जास्त रकमेच्या फरकाने स्थिर आहे. मंदिर परिसरात ठिकठिकाणी देवस्थान समितीच्या १३ ते १४ दानपेट्या आहेत. दर महिना- दोन महिन्याला पेटीतील रक्कम काढली जाते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मोजणीत १ कोटी ७९ लाखांच्या रकमेची अधिकची भर देवीच्या खजिन्यात पडली होती.उत्पन्नाप्रमाणेच खर्चही..अंबाबाई मंदिराचे उत्पन्न वाढलेले दिसत असले तरी त्या प्रमाणात खर्चदेखील आहे. या मंदिरावरच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अर्थकारण अवलंबून आहे. लाईट बिल, पाणी बिलापासून कर्मचाऱ्यांच्या पगारापर्यंतचे सगळे खर्च या उत्पन्नातून भागवले जातात. अंबाबाई पाठोपाठ जोतिबा देवस्थानला चांगले उत्पन्न मिळते मात्र ही रक्कम अंबाबाईच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे.

मागील तीन वर्षातील आकडेवारीसन : दान पेटीतील उत्पन्न

  • २०२२-२३ : ११ कोटी २४ लाख ७३ हजार ७६१
  • २०२३-२४ : १२ कोटी १४ लाख ५९ हजार ९६१
  • २०२४-२५ : ११ कोटी ७९ लाख ००, ३००
  • एकूण : ३५ कोटी १८ लाख ३४ हजार ०२२

मागीलवर्षी रक्कम कमी कशी?दरवर्षी देणगी पेटीतील रक्कम वाढत्या क्रमाने असते मात्र २०२३-२४ मध्ये १२ कोटी १४ लाख आणि चालूवर्षी ११ कोटी ७९ लाखांची रक्कम देवस्थानच्या नोंदीत आहे. याबाबत चौकशी केली असता देणगी आलेल्या पेट्या माेजण्यासाठी कधी काढल्या जातात त्यावरदेखील हे अवलंबून असल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले .