शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: February 20, 2015 23:32 IST

‘एव्हीएच’प्रकरण : हवा प्रदूषणाची तपासणी न केल्याने आंदोलन

चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेला एव्हीएच केमिकल प्रकल्पातून काळा धूर येत असल्यामुळे शिवसेनेच्यावतीने प्रकल्पाच्या तपासणीसाठी आज, शुक्रवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथकाला बोलावले होते. मात्र धूर येत नसल्याने परत निघालेल्या पथकाला संतप्त जमावाने घेराव घातला. या प्रकल्पातून काळा धूर येत असल्यामुळे शिवसेनेच्यावतीने प्रकल्पाची तपासणीसाठी आज, शुक्रवारी कोल्हापूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी प्रकल्पस्थळी सायंकाळी ६.३० वाजता बोलावले होते. मात्र, एव्हीएच बंद असल्यामुळे कंपनीच्या चिमणीतून काळा धूर न दिसल्यामुळे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना काही तपासणी करता आली नाही. त्यामुळे गाडीमधून आणलेली यंत्रसामुग्री परत घेऊन जाऊ लागले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक आनंद कामोजी यांनी प्रकल्प सुरू आहे. मात्र, उत्पादन न घेता ट्रायल घेत आहोत. त्यामुळे कदाचित धूर येत असेल, असे सांगितले. प्रदूषण मंडळाचे अधिकारी मनीष होळकर यांनी कंपनी सुरू झाल्याशिवाय परिसरातील हवा तपासता येणार नाही. ज्यावेळी कंपनी सुरू होईल त्यावेळी परिसरातील हवा तपासून हवेतील प्रदूषणाचे नमुने शासनाकडे पाठवू असे सांगितले. यावेळी संतप्त जमावाने त्यांना घेराव घालून एव्हीएच प्रकल्पामध्ये मुक्काम राहून प्रकल्पातून निघणाऱ्या धुराचे नमुने तपासा, अशी मागणी केली. मात्र, यावेळी पोलीस उपनिरीक्षक शरद माळी यांनी त्यांच्या पद्धतीने काम करू द्या म्हणून मध्यस्थी केली. प्रदूषण मंडळाच्या अधिकारी वर्षा कदम, प्रा. सुनील शिंत्रे, तालुकाप्रमुख महादेव गावडे, शांता जाधव, नीलेश कोठारी, अ‍ॅड. संतोष मळवीकर, पांडुरंग बेनके, अशोक कांबळे, अजिंक्य बिरंजे, सुधीर राणे, प्रसाद आडनाईक, प्रमोद पाटील, संजय पाटील, शिवाजी सावंत, आदींसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)