आजरा पंचायत समितीचे साहाय्यक गटविकास अधिकारी जगदाळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:17 IST2021-06-03T04:17:58+5:302021-06-03T04:17:58+5:30

पी. बी. जगदाळे यांनी विस्तार अधिकारी ते साहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून आजरा, गडहिंग्लज, चंदगड येथे काम केले. संपूर्ण स्वच्छता ...

Ajra Panchayat Samiti Assistant Group Development Officer Jagdale felicitated on the occasion of his retirement | आजरा पंचायत समितीचे साहाय्यक गटविकास अधिकारी जगदाळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

आजरा पंचायत समितीचे साहाय्यक गटविकास अधिकारी जगदाळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

पी. बी. जगदाळे यांनी विस्तार अधिकारी ते साहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून आजरा, गडहिंग्लज, चंदगड येथे काम केले. संपूर्ण स्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलित ग्रामसमृद्धी योजना, यशवंत ग्रामसमृद्धी योजना, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, यशवंत पंचायत राज सशक्तीकरण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री आवास योजना या योजना यशस्वीपणे राबवून आजरा पंचायत समितीने जिल्हा परिषदेसह राज्यात एक वेगळे वर्चस्व निर्माण केले आहे. त्यांनी आजरा, चंदगड, भुदरगड, शिरोळ येथेही गटविकास अधिकारी वर्ग १ या पदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला आहे.

आजरा पंचायत समितीच्या सभागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत व कोरोनाचे सर्व नियम पाळून सेवानिवृत्त झालेले पी. बी. जगदाळे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.

--------------------

* फोटो ओळी : आजरा पंचायत समितीचे साहाय्यक गटविकास अधिकारी पी. बी. जगदाळे यांचा सत्कार करताना गटविकास अधिकारी बी. डी. वाघ उपस्थित होते.

क्रमांक : ०२०६२०२१-गड-०६

Web Title: Ajra Panchayat Samiti Assistant Group Development Officer Jagdale felicitated on the occasion of his retirement