शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

अजित कर्णेला वेध ‘युनिक रेकॉर्ड’चे

By admin | Updated: July 12, 2014 00:42 IST

आर्थिक मदतीची गरज : एका मिनिटात डोक्याने ५१ विटा फोडणार

शिवाजी कोळी : वसगडे, वयाच्या बाराव्या वर्षी मित्राने डोक्यात वीट फेकून मारली. वीट फुटली; पण डोक्याला काहीच इजा झाली नाही. घटना भयंकर असली तरी मार्शल आर्ट कलेचे आकर्षण निर्माण झाल्याने गांधीनगर (ता. करवीर) येथील अजित पोपट कर्णे या युवकाने जिद्दीने कलाच आत्मसात केली. एका मिनिटात ५१ विटा डोक्याने फोडून ‘युनिक रेकॉर्ड’ करू इच्छिणाऱ्या ध्येयवेड्या अजितला आर्थिक मदतीची गरज आहे.अजित कर्णे सातवीच्या वर्गात शिक्षण घेत असताना शाळेतील भांडणातून एका मित्राने त्याच्या डोक्यामध्ये वीट फेकून मारली. ती वीट फुटली; पण अजितच्या डोक्याला काहीही जखम झाली नाही. त्यानंतर मार्शल आर्ट या कलेबद्दल आकर्षण निर्माण होऊन त्याने सलग तीन वर्षे जिद्दीने डोक्याने वीट फोडण्याचा सराव केला. दरम्यान, अजितचे वडील पोपट कर्णे यांच्या पायावर मशीन पडून त्या दुर्घटनेत ते एका पायाने अपंग झाले. त्यामुळे वयाच्या बाविसाव्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अजितवर पडली. त्यावेळी वडिलांनी अजितला प्रोत्साहन देऊन त्याला अखंड सराव करण्यास भाग पाडले. सध्या जिथे बांधकाम सुरू असेल, त्या ठिकाणी अजित ‘डेमो’चा सराव करतो. त्यावेळी संबंधित मालकाकडून बक्षीस आणि प्रोत्साहन मिळत असल्याचे कर्णे याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.२०१० सालच्या गणपती उत्सवात एका मिनिटात ४१ विटा डोक्याने फोडून अजितने विक्रम केला. सध्या तो एका मिनिटात साठच्यावर विटा डोक्याने फोडतो. मार्शल आर्टची कला आत्मसात केली असली तरी घरची परिस्थिती हलाखीची असलेल्या अजितला युनिक रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्याचे ध्येय असल्याने त्याला आर्थिक मदतीचे आवाहन कोल्हापूर कराटे-दो असोसिएशनचे अध्यक्ष कपिल केसरकर यांनी केले आहे.