शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
2
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
3
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
4
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
5
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
6
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
7
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
8
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
9
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
10
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
11
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
12
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
13
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
14
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
15
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
16
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
17
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
18
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
19
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
20
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा जातीनेच घेतला सूरजचा बळी

By admin | Updated: January 9, 2015 00:46 IST

विचारपूस नाही : शासकीय यंत्रणाही ढिम्मच

सचिन भोसले -कोल्हापूर - असंवेदनशील यंत्रणा आणि संस्थाचालकांचा नसलेला वचक यांमुळे एका उमलणाऱ्या भविष्याचा गुरुवारी अंत झाला. पाचगाव येथील राजर्षी छत्रपती शाहू आश्रमशाळेत नववीत शिकणाऱ्या सूरज पोवारने शाळा अधीक्षक व शिक्षकांनी वारंवार केलेल्या मानहानीमुळे शांतीनगर, उचगाव येथील राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.
सूरजची मृत्यूशी झुंज सुरू असताना एकाही शासकीय अधिकाऱ्याने त्याची साधी चौकशीही केली नाही. भटक्या जाती जमातींतील मुले शिकून शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी सुरु झालेल्या शाळेत परत या मुलाचा जातीनेच बळी घेतला असे वास्तव या घटनेतून पुढे आले आहे.
रंजल्या-गांजलेल्या समाजातील मुले शिकून शहाणी व्हावीत
म्हणून कोल्हापुरात संस्थानकाळात राजर्षी शाहू महाराजांनी विविध जातिधर्मांच्या मुलांसाठी इंग्लंडच्या धर्तीवर कोल्हापुरातही वसतिगृहे काढली. यामुळे अनेक मुले त्या
काळी शिकली आणि आजही शिकत आहेत. अशा करवीरनगरीतच्या पाचगाव येथील राजर्षींच्याच नावे असलेल्या आश्रमशाळेतील सतरा वर्षांच्या सूरज पोवार याने आत्महत्या केली. हा दुदैवी प्रकार म्हणजे एका उमलत्या भविष्याचा जणू संवेदना नसणाऱ्या यंत्रणेमुळे हकनाक जीव गेला.
आठ वर्षांपूर्वी सूरजचे वडील शामराव पोवार यांचे व्यसनामुळे निधन झाले. काही वर्षे आईने सूरजसह दोन मोठ्या भावांचा सांभाळ केला. पुढे आईचेही निधन झाले. त्यामुळे सूरज लहान असल्याने कधी मोठ्या भावांबरोबर, तर कधी काका अप्पाजी काळे आणि मामांकडे राहत होता. सातवीपर्यंत तो रजपूतवाडी
येथील व्यंकाप्पा भोसले यांच्या आश्रमशाळेत शिकला. पुढे त्याने पाचगाव येथील राजर्षी छत्रपती शाहू आश्रमशाळेत प्रवेश घेतला.
३० डिसेंबरला त्याच्यावर शाळेतील अधीक्षक आणि शिक्षकांनी चोरीचा आळ घेतल्याची तक्रार
आहे. तू फासेपारध्याचा असल्याने चोऱ्याच करणार असे रागाने शिक्षक म्हटल्याने तो तडक मामाकडे निघून गेला व मामाच्या घरी रॉकेल
ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.


मुलाचा जीव गेला त्याचे काय...?
नऊ दिवस सूरज राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना त्याच्याकडे नातेवाइकांशिवाय कोणीच फिरकले नाही. त्याची विचारपूस करायला ना शाळेचे कर्मचारी आले, ना समाजकल्याण विभागाचा कोणी अधिकारी. आश्रमशाळा तशा समाज व शासनाच्याही लेखी दुर्लक्षितच. तसेच दुर्लक्ष या घटनेकडेही झाले व शिकून आयुष्याचे भले झाले असते असे एक आयुष्य उमलण्यापूर्वीच कोमजले. आता चौकशा होतील, पाहणी केली जाईल परंतु मुलाचा जीव गेला त्याचे काय...?