शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
3
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
4
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
5
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
6
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
7
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
8
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
9
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
10
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
11
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
12
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
13
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
14
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
15
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
16
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
17
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
18
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
19
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
20
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

प्रशासकांच्या कानउघाडणीनंतर यंत्रणा लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 11:51 AM

दीड महिन्यापूर्वी आदेश देऊनही महापालिकेच्या ओपन स्पेसवरील अतिक्रमणावर कारवाई करण्यास चालढकलपणा का सुरू आहे? कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, अशा शब्दांत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी संबंधितांची कानउघाडणी केली. यानंतर युद्धपातळीवर संबंधित विभागाची कारवाईसाठी यंत्रणा कामाला लागली. तीन तासांत चार ओपन स्पेसवरील अतिक्रमणे हटविण्यात आली.

ठळक मुद्देप्रशासकांच्या कानउघाडणीनंतर यंत्रणा लागली कामाला तीन तासांत चार ओपन स्पेसवरील अतिक्रमणे हटविली

कोल्हापूर : दीड महिन्यापूर्वी आदेश देऊनही महापालिकेच्या ओपन स्पेसवरील अतिक्रमणावर कारवाई करण्यास चालढकलपणा का सुरू आहे? कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, अशा शब्दांत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी संबंधितांची कानउघाडणी केली. यानंतर युद्धपातळीवर संबंधित विभागाची कारवाईसाठी यंत्रणा कामाला लागली. तीन तासांत चार ओपन स्पेसवरील अतिक्रमणे हटविण्यात आली.लाईन बझार येथील दोन ओपन स्पेसमधील अनधिकृत सात शेड, निवारा कॉलनी येथील एक वीट बांधकामाचे शेड व रमणमळा येथील एक पत्र्याचे शेड काढण्यात आले. ही कारवाई महापालिकेच्या नगररचना, अतिक्रमण, इस्टेट विभाग व विभागीय कार्यालय क्रमांक ४ च्या वतीने करण्यात आली. लाईन बझार येथील कारवाईवेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पाहणी करून ओपन स्पेसवरील सर्व अतिक्रमणे काढण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

एक जेसीबी व दोन डंपरच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, अतिक्रमणचे पंडित पोवार, व्ही. एन. सुरवसे, सर्व्हेअर श्याम शेटे, अनिल पाटील यांनी केली.आता तुमच्यावर कोणाचा दबाव ?महापालिकेमध्ये मंगळवारी विभागप्रमुखांची आढावा बैठक झाली. या बैठकीची सुरुवातच शहरातील ओपनस्पेसवरील अतिक्रमणावरून झाली. दीड महिन्यापूर्वी कारवाई करण्याचे सांगूनही दुर्लक्ष का केले? महापालिकेची सभागृहाची मुदत संपली असून आता तुमच्यावर कारवाईसाठी कोणाचा दबाव आहे, अशा शब्दांत प्रशासक डॉ. बलकवडे यांनी संबंधितांना सुनावले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर