kolhapur-Gokul Dudh Sangh: प्रशासक आले, ‘गोकुळ’चे संकलन ६० हजार लिटरने कमी झाले; मंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 16:24 IST2026-05-16T16:21:07+5:302026-05-16T16:24:38+5:30

सरकारी अधिकारी चार महिन्यांचे पाहुणे; त्यांनी राजकारण करू नये

Administrators came Gokul Dudh Sangh collection decreased by 60 thousand liters; Minister Hasan Mushrif alleges | kolhapur-Gokul Dudh Sangh: प्रशासक आले, ‘गोकुळ’चे संकलन ६० हजार लिटरने कमी झाले; मंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप

kolhapur-Gokul Dudh Sangh: प्रशासक आले, ‘गोकुळ’चे संकलन ६० हजार लिटरने कमी झाले; मंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघावर प्रशासकीय मंडळ आल्यानंतर दूध संकलनात ६० हजार लिटरची घट झाली असून, संकलनात घट हाेणे धोक्याची घंटा आहे. प्रशासकीय मंडळातील अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनी राजकारणात भाग घेता कामा नये. पण, काही अधिकारी भाग घेत असल्यानेच दूध संस्था प्रतिनिधींसोबत वाद होत आहेत. हे सरकारी अधिकारी चार महिन्यांचे पाहुणे आहेत, ‘गोकुळ’ येथेच राहणार असून, कोल्हापूरचे भुमिपूत्रच तिथे काम करणार आहेत, हे ध्यानात ठेवा, असा इशारा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, दूध कमी होण्यास उष्णतेचे कारण असले तरी दूध उत्पादकांनी उत्पादीत केलेले जास्तीत जास्त दूध ‘गोकुळ’ला पाठवावे. प्रशासकांना काम करू दिले पाहिजे, त्यांनीही ‘गोकुळ’ची बदनामी होईल, ब्रॅन्डला धक्का लागेल, असे काम करता कामा नये.

‘गोकुळ’ निवडणुकीची घटका आली समीप!

‘गोकुळ’च्या निवडणुकीबाबत सर्वेाच्च न्यायालयाच्या निकालाचे अधिकारी वेगवेगळे अर्थ काढत आहेत. असू दे! पण एक सांगतो, ‘अधिक महिन्यामुळे लग्न समारंभ आता महिनाभर होणार नाहीत.’ मात्र, ‘गोकुळ’ निवडणुकीची घटका समीप आली आहे, एवढेच सांगतो. युती म्हणून आम्ही निवडणूक लढणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

‘महाडिक-पाटील’ यांनाच विचारा

आमदार सतेज पाटील व आमदार अमल महाडिक हे एकत्र येण्याची चर्चा सुरू असल्याबाबत विचारले असता, मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘ते त्या दोघांना विचारा, त्यांनी काय करावे, हा त्यांचा प्रश्न आहे’.

शिवाजीराव पाटील यांना पुन्हा आठ दिवसांची मुदत

आमदार शिवाजीराव पाटील यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार होतात, त्याचे काय झाले? यावर, मंत्री मुश्रीफ म्हणाले, आमदार पाटील यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या असाव्यात. पण, गेल्या ७-८ दिवसापासून ते शांत आहेत. ते आमचे सहकारी आहेत, ते काही बोलत नाहीत, याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांनी केडीसीसी बँकेबाबत केलेल्या आरोपाचे पुरावे देण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली होती, आता आणखी आठ दिवसांची मुदत देत आहोत.

Web Title : गोकुल दुग्ध संघ: प्रशासक नियुक्ति के बाद संग्रह में गिरावट, हसन मुश्रीफ का आरोप

Web Summary : हसन मुश्रीफ का आरोप है कि प्रशासक की नियुक्ति के बाद गोकुल के दूध संग्रह में 60,000 लीटर की गिरावट आई है। उन्होंने अधिकारियों को राजनीतिक भागीदारी के खिलाफ चेतावनी दी, स्थानीय नियंत्रण पर जोर दिया। गोकुल चुनाव नजदीक, गठबंधन के रूप में लड़ा जाएगा। मुश्रीफ विधायक पाटिल के बैंक प्रमाण का इंतजार कर रहे हैं, समय सीमा बढ़ाई।

Web Title : Gokul Milk Union: Collection Down After Administrator Appointment, Alleges Hasan Mushrif

Web Summary : Hasan Mushrif alleges a 60,000-liter drop in Gokul's milk collection post-administrator appointment. He warns officials against political involvement, emphasizing local control. Gokul election nears, fought as a coalition. Mushrif awaits MLA Patil's bank proof, extending deadline.