शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

वरातीत नाचण्यावरून दोन गटांत हाणामारी

By admin | Updated: December 17, 2014 22:53 IST

साताऱ्यातील घटना : पाच गंभीर जखमी

सातारा : वरातीमध्ये नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून दोन गटांत कुऱ्हाड, काठी आणि दगडाने तुंबळ मारामारी झाली. या घटनेत पाचजण गंभीर जखमी झाले असून, त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. ही घटना आज, बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास साताऱ्यातील नामदेववाडीत घडली.सेठिबा भानादास खवले (वय ६५), लक्ष्मण सेठिबा खवले (४५), किसन सेठिबा खवले (४०), विठाबाई कल्पना खवले (५५), अनिल कल्याण खवले (२२, सर्व रा. नामदेववाडी झोपडपट्टी, बुधवार नाक्याजवळ, सातारा) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आज दुपारी खवले कुटुंबातील एकाचे लग्न होते. या लग्नाच्या वरातीमध्ये नाचण्याच्या कारणावरून दोन युवकांमध्ये वादावादी झाली होती. दरम्यान, सायंकाळी हा वाद मिटविण्यासाठी दोन्ही गटांचे प्रयत्न सुरू होते. त्यावेळी शाब्दिक बाचाबाचीतून दोन्ही गट एकमेकांना भिडले. कुऱ्हाड, काठी, दगडांनी एकमेकांवर वर्षाव सुरू झाला. यामध्ये पाचजण गंभीर जखमी झाले. सुमारे पंधरा मिनिटे ही धुमश्चक्री सुरू होती. नामदेववाडीतीलच काही युवकांनी दोन्ही गट वेगवेगळे केले. त्यामुळे वाद मिटला. त्यानंतर जखमींना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. ओठ, डोके, पाठ, आदी ठिकाणी या पाचजणांना गंभीर जखमा झाल्या आहेत. हा प्रकार घडल्यानंतर शाहूपुरी पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती. (प्रतिनिधी)नातेवाइकांचा आक्रोश..नामदेववाडीत मारामारी झाल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठ्या संख्येने जमाव जमला. त्यामुळे शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ रुग्णालयासमोर बंदोबस्त तैनात केला. जखमींचे नातेवाईक रुग्णालयासमोर आक्रोश करत होते. पाचपैकी दोनजणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या दोघांना खासगी रुग्णालयात हलविण्याचे नातेवाइकांचे रात्री उशिरा प्रयत्न सुरू होते.