शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी गटार कामामुळे अपघाताचा धोका

By admin | Updated: November 30, 2015 01:16 IST

यड्राव फाटा मार्ग : उपाययोजनांबाबत दुर्लक्ष; पंचगंगा कारखाना-जनता सूतगिरणी मार्ग जीवघेणा

यड्राव : पंचगंगा साखर कारखान्याकडून जनता सूतगिरणीकडे जाणाऱ्या मार्गावर सुरू असलेले भुयारी गटारीचे काम ठेकेदाराच्या उपाययोजनांअभावी धोकादायक बनले आहे. या मार्गावरील ऊस वाहतूकसह इतर वाहतुकीची रहदारी असूनही मोठ्या खड्ड्याशेजारी सूचना फलक, रात्रीच्या वेळी सावधानता किंवा खड्ड्याभोवती मुरुमाचा ढिगारा करून अपघाताचा संभाव्य धोका टाळण्याची दक्षता ठेकेदाराकडून घेतली नसल्याने याकरिता एखाद्या अपघाताची घटना घडल्यावरच सावधानता व सुरक्षितता उपाय सुचणार का, असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे.इचलकरंजी नगरपालिका हद्दीत भुयारी गटारीचे काम सुरू आहे. पंचगंगा साखर कारखान्याकडून यड्राव फाट्याकडे जाणाऱ्या मार्गावर जनता सूतगिरणीपर्यंतच्या हद्दीपर्यंत गटार योजनेचे काम सुरू आहे. या योजनेंतर्गत ड्रेनेज खड्ड्यासाठी सुमारे पंचवीस फूट खोल व पंधरा फूट रुंदीचे खड्डे जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात येत आहेत. अर्धा किलोमीटरच्या अंतरामध्ये असे चार ते पाच मोठे खड्डे काढण्यात आले आहेत. हे काम या रहदारीच्या मार्गावरच सुरू आहे. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. यामुळे या मार्गावर रात्रंदिवस ट्रक, ट्रॅक्टरची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. त्याचबरोबर हा भाग औद्योगिक वसाहतीचा असल्याने मालवाहतुकीची रहदारीही मोठ्या प्रमाणात आहे.भुयारी गटारीचे काम व्हिस्टा कोअर कंपनीकडून सुरू आहे. हे काम सुरू असताना कामाभोवती ठेकेदाराने सावधानतेचा कोणताही सूचना फलक किंवा खड्ड्यामुळे अपघात होऊ नये, याबाबतची दक्षता घेतली नाही. फक्त तांबड्या रेबिनी आडव्या बांधून आपली याबाबतची जबाबदारी संपविल्याचे दाखवून दिले आहे. या उकरलेल्या खड्ड्यांभोवती मुरुमाचा ढिगारा उभारणे, सूचना फलक लावणे, रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसण्यासाठी पांढरा रंग किंवा चुना वापरून सावधानता बाळगण्याची तसदी ठेकेदाराकडून घेतली गेली नाही.हा परिसर औद्योगिक असल्याने रात्रंदिवस कामगार व मालवाहतूक सुरू असते. तसेच सध्या साखर कारखाने सुरू असल्याने वाहनांसाठी व कामगारांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. एखादे वाहन या खड्ड्यामध्ये अपघातग्रस्त झाले, तर ते सहजपणे दिसून येणार नाही इतकी त्याची रुंदी व खोली असूनही ठेकेदाराकडून याबाबत दुर्लक्ष होत आहे. एखादी घटना घडल्यावरच उपाययोजना सुरू होणार का, असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)डे्रनेज बांधकाम पूर्ण : अपघाताची भीती--रस्त्यावरच ड्रेनेजचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याठिकाणी रस्त्यापेक्षा अर्धा फूटवर चेंबरचे बांधकाम आले आहे. यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले आहेत. ऊस भरून येणारे ट्रक, ट्रॅक्टर यावरून गेले, तर ते उलटून अपघात घडू शकतो. काही ठिकाणी चेंबरलगत खोलगटपणा आल्याने वाहनाचे चाक रूतून अपघाताची शक्यता आहे. ड्रेनेज चेंबरशेजारी मुरुम भरून सपाटीकरण करणे, खड्ड्याभोवती संरक्षक उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.