संक्षिप्त.. क्राईम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:23 IST2020-12-24T04:23:22+5:302020-12-24T04:23:22+5:30

कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी कागलमधील जयसिंगराव तलावानजीक विष प्राशन करून अत्यावस्थेत आढळलेल्या युवकाचा बुधवारी मृत्यू झाला. अनिकेत शिवाजी पोवार ...

Abbreviated .. Crime | संक्षिप्त.. क्राईम

संक्षिप्त.. क्राईम

कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी कागलमधील जयसिंगराव तलावानजीक विष प्राशन करून अत्यावस्थेत आढळलेल्या युवकाचा बुधवारी मृत्यू झाला. अनिकेत शिवाजी पोवार (वय २२, रा. साके, ता. कागल) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या मृत्यूची नोंद सीपीआर चौकीमध्ये झाली आहे.

.......................................

पुण्यातील वृद्ध भाविकाचा मृत्यू

कोल्हापूर : पुण्यातील आयटी पार्कमधील मोरे कुटुंबीय मंगळवारी (दि. २२) श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आले होते. ते पाटोळेवाडीत थांबले होते. त्यातील सुरेशचंद्र बाबूराव मोरे (वय ७७) हे मार्केट यार्डमध्ये बेशुद्ध पडले. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उचपार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

..............................................

कपिलेश्वर येथील महिलेचा विषप्राशनाने मृत्यू

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर येथील नंदा बाळासाहेब पाटील (वय ३४) यांनी राहत्या घरी मंगळवारी विष प्राशन केले होते. त्यांना बेशुद्धावस्थेत सीपीआर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

................................................

ठमकेवाडीतील जखमीचा मृत्यू

कोल्हापूर : ठमकेवाडी (ता. शाहूवाडी) येथे शाळेच्या कठड्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा सीपीआर रुग़्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी मृत्यू झाला. शिवाजी शामराव माने (वय ४६) असे मृताचे नाव आहे. ही दुर्घटना शुक्रवारी (दि. १८) घडली होती.

.................................

शेतातील पाला पेटवताना वृद्धा भाजून जखमी

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील पाटेकरवाडी येथे ऊसतोडणी झाल्यानंतर शेतातील पाला पेटवताना तोल जाऊन आगीत पडल्याने वृद्धा भाजून गंभीर जखमी झाल्या. इंदूबाई पांडुरंग पाटील (वय ८०, रा. पाटेकरवाडी) असे जखमी वृद्धेचे नाव आहे. त्यांच्यावर सीपीआर रुग़्णालयात उपचार सुरू आहेत.

हुपरीत मारामारीत दोघे जखमी

कोल्हापूर : हुपरी (ता. हातकणंगले) येथे झालेल्या हाणामारीत दोघे जखमी झाले. विठ्ठल यमनाप्पा इंगळे (वय ६५) व विद्या संजय इंगळे (३४, दोघेही रा. हुपरी) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Abbreviated .. Crime