शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिण्यासाठी पाणी दिले नाही, रागातून एकास मारहाण; कोल्हापुरातील घटना

By उद्धव गोडसे | Updated: June 5, 2024 12:45 IST

सराईत गुंडासह तीन सख्ख्या भावांची दहशत, गुंड वसिम मलिक यास अटक

कोल्हापूर : यादवनगरातील पांजरपोळ परिसरात दारू पिण्यासाठी पाणी न दिल्याच्या रागातून तिघांनी कल्लाप्पा कल्लोळी कु-हाडे (वय ४५, रा. १४ वी गल्ली, राजारामपुरी) यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून बेदम मारहाण केली. हा प्रकार सोमवारी (दि. ३) सायंकाळी पाचच्या सुमारास लक्ष्मीनारायण फॅब्रिकेशन येथे घडला. याबाबत कु-हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी सराईत गुंड राजकुमार वसिम मलिक (वय २८) याच्यासह त्याचे सख्खे भाऊ विपूल आणि मीलन (तिघे रा. उजळाईवाडी, ता. करवीर) या तिघांवर गुन्हा दाखल केला. यातील राजकुमार मलिक याला पोलिसांनी अटक केली.याबाबत अधिक माहिती अशी की, उजळाईवाडी येथील सराईत गुंड राजकुमार मलिक आणि त्याचे दोन भाऊ सोमवारी सायंकाळी यादवनगरातील पांजरपोळ येथे लक्ष्मीनारायण फॅब्रिकेशनसमोर दारू पित बसले होते. यातील एकाने फॅब्रिकेशनमध्ये जाऊन पाणी मागितले. मात्र, फॅब्रिकेशनमधील कर्मचारी कु-हाडे यांनी पाणी भरले नसल्याचे सांगत पाणी देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने मलिक बंधूंनी कु-हाडे यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्यांना मारहाण केली. परिसरातील नागरिकांची गर्दी जमताच तिन्ही गुडांनी पळ काढला. यातील राजकुमार मलिक हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड असून, त्याच्यावर मारामारी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दहशत माजवण्याचे गुन्हे दाखल आहेत. फिर्याद दाखल होताच राजारामपुरी पोलिसांनी त्याला अटक केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस