शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

Kolhapur: का केली घाई..माझ्या मुलांचा यात काय दोष? विचारतेय आई; अपघातात मुले गमावलेली माऊली ढाळतेय अश्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 19:18 IST

कोल्हापूर शहरातील सायबर चौकात निवृत्त प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण यांच्या गाडीने दिलेल्या धडकेत झाला होता मृत्यू

कोल्हापूर : माझ्या मुलांनी खूप-खूप मोठं व्हावं, खूप शिकावं यासाठी तिने असंख्य स्वप्नं पाहिली असतील, ही आनंददायी स्वप्नं ती भरभरून जगलीही असेल. मात्र, याच स्वप्नांचा एका भरदुपारच्या टळटळीत उन्हानं चक्काचूर केला. ती दुपार ती माउली आजही विसरत नाही. ‘माझा, माझ्या मुलांचा यात सांगा काय दोष?’ असा पाझर फोडणारा सवाल करत ‘आता, कुणावर मी माया करू ?’ अशी विचारणा ती मनालाच करत आहे.कोल्हापूर शहरातील सायबर चौकात ३ जून २०२४ रोजी निवृत्त प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण यांच्या गाडीने धडक दिल्याने मृत्युमुखी पडलेल्या प्रथमेश सचिन पाटील आणि हर्षद सचिन पाटील या सख्ख्या भावंडांची ही आई. या अपघातात दोन सख्खे भाऊ कोणताही दोष नसताना आईवडिलांपासून कायमचे दुरावले.

काळीज पिळवटून टाकणारा हा अपघात कदाचित कोल्हापूरकरांच्या विस्मरणात गेला असेल; पण दोन पोटच्या गोळ्यांची या अपघाताने केलेली ताटातूट ती माउली आजही विसरू शकत नाही. आज, शनिवारी तिथीनुसार या दोन भावंडांचे पहिले पुण्यस्मरण असून, त्यानिमित्ताने दौलतनगर परिसरातील त्यांच्या अभिवादनाचे फलक पाहून येणा-जाणारेही गलबलून जात आहेत.दौलतनगरातील सचिन पाटील यांचे पत्नी, दोन मुलांचे हसतेखेळते कुटुंब. प्रथमेश बी. कॉम.च्या दुसऱ्या वर्षाला, तर हर्षद नुकताच चांगल्या गुणांनी दहावी उत्तीर्ण झालेला. ३ जूनला ही दोन भावंडं आत्याच्या मुलासोबत दुचाकीवरून राजाराम तलावात पोहण्यासाठी जात होती. मात्र, न पोहताच माघारी येत असताना सायबर चौकात शिवाजी विद्यापीठातील माजी प्र-कुलगुरूंच्या कारने धडक दिल्याने या दोन भावंडांचा जागीच मृत्यू झाला. घरातील दोन्ही मुले कायमची गमावल्याने पाटील दाम्पत्य यातून अजूनही सावरलेले नाही. घरात, अंगणात बागडणारी दोन्ही मुले आता कधीच परत येणार नाहीत, ही भावनाच त्यांचे काळीज चर्रर्र करून टाकत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू