शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘गोकुळ’मध्ये नेत्यांच्यात रंगली जुगलबंदी; भविष्यातही माझी गरज, सतेज पाटलांनी चिमटा काढला, मुश्रीफ म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 13:29 IST

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकालादिवशीच एकमेकांच्या विरोधात प्रतिष्ठापणाला लागलेले नेते एकाच व्यासपीठावर

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या नवीन जनरेटरचे उद्घाटन झाले, नारळ सर्वांनी फोडला, पण जनरेटर सुरू करण्याचे बटन दाबण्याचा मान मात्र मलाच मिळाला. म्हणजे जनरेटर चालू करणारा मीच आहे, त्यामुळे पुढेही मी तुम्हाला लागणारच, असा मिश्किल चिमटा काॅंग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी काढला. तर महापालिकेच्या निवडणुकीत सतेज पाटील (बंटी) व आपल्यामध्ये संघर्ष झाला, आता त्यांनी संघर्ष न करता आमच्यासोबत यावे, अशी गुगली वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी टाकली.

गोकुळ’ दूध संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांची १२ वी पुण्यतिथी व २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केल्याबद्दल कलश पूजन समारंभ शुक्रवारी संघाच्या गोकुळ शिरगाव येथील दूध प्रकल्पावर झाला. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘राजकारणात आपल्या भूमिका वेगवेगळ्या असतील, पण ‘गोकुळ’मध्ये आम्ही सर्वजण एकत्र आहोत. ‘गोकुळ’ ही कोल्हापूरची ओळख असून, शेतकऱ्यांचे हित जपणे हेच आपले सामूहिक ध्येय आहे.’

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘गोकुळ’मध्ये आम्ही सर्वजण शेतकरी हितासाठी एकत्र आलो आहोत. शरीराने सगळे येथे उपस्थित असलो तरी मनाने सध्या सगळ्यांचे लक्ष महानगरपालिकेच्या निकालाकडे लागले आहे. तिथे आम्ही आणि बंटी पाटील यांनी संघर्ष केला आहे. आता बंटी पाटील यांनी संघर्ष न करता आमच्यासमवेत यावे.’ ‘ठीक आहे, पण पालकमंत्री प्रकाश आबिटकर व के. पी. पाटील यांचे काय ते सांगा’, अशी सतेज पाटील यांनी विचारणा केल्यानंतर व्यासपीठावर एकच हशा पिकला.

‘गोकुळ’च्या दुधाचा पांढराच रंग

संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले, स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर हे नेहमी सांगायचे, शेतकरी हाच माझा पक्ष आहे. दुधामध्ये कुठलाही भेदभाव नसतो. सर्व दूध पांढरेच असते, त्यामुळे भविष्यात ‘गोकुळ’च्या दुधाचा रंगही पांढराच राहील. २५ लाख लिटरच्या कलश पूजनाचा कार्यक्रम आपणा सर्वांच्या हस्ते व्हावा आणि त्यावेळीही आम्ही उपस्थित असावे, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Political banter at Gokul inauguration; Patil takes a dig at Mushrif.

Web Summary : At Gokul's event, Satej Patil hinted at his continued relevance. Hasan Mushrif invited Patil to join them, sparking laughter regarding future alliances with other leaders. Focus remains on farmer welfare.