शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

८०० कोटींची उलाढाल ठप्प

By admin | Updated: December 6, 2014 00:27 IST

बॅँक कर्मचाऱ्यांचा संप : पुढील संप बेमुदत करण्याचा इशारा

कसबा बावडा : २५ टक्के पगारवाढ करा, निवृत्ती वेतनात सुधारणा करा, नवीन नोकरभरती करा, या व अन्य इतर मागण्यांसाठी आज, शुक्रवारी राष्ट्रीयकृत बॅँकाचे कर्मचारी संपावर गेल्याने जिल्ह्यातील आर्थिक व्यवहार थंडावले. दरम्यान, सकाळी ११ वाजता बॅँक आॅफ इंडिया, लक्ष्मीपुरी शाखेसमोर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने करीत पुढील संप हा बेमुदत असेल, असा सरकारला इशारा दिला. संपामुळे जिल्ह्यात ७५० ते ८०० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. युनायटेड फोरम आॅफ बॅँक युनियन या बॅँक अधिकारी, कर्मचारी संघटनेने या एकदिवसीय संपाची हाक दिली होती. त्यास मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी पाठिंबा देऊन संप यशस्वी केला. देशाच्या पश्चिम भारतातील महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यांतील सुमारे चार लाख कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सहा हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. या संपाचा परिणाम आर्थिक व्यवहारावर झाला. शहरात दररोज ११५ ते १२५ कोटी रुपयांचे क्लिअरिंग होते. हा व्यवहारही आज होऊ शकला नाही. दरम्यान, शहरातील राष्ट्रीयकृत बॅँकानी आपापल्या बॅँकांसमोर निदर्शने करून बॅँक आॅफ इंडिया, लक्ष्मीपुरी शाखेसमोर जाऊन जोरदार निदर्शने केली. यावेळी येत्या आठवडाभरात दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्यास पुढील संप हा बेमुदत असेल असा इशाराही देण्यात आला. बॅँक आॅफ इंडियाचे अशोक चौगले, मोहन चोडणकर, दिलीप पाडळे, राजाराम परीट, बळवंत कुऱ्हाडे, विक्रांत देसाई, तसेच स्टेट बॅँकेचे मिलिंद इनामदार, उदय बेनाडीकर, मकरंद करंदीकर, विलास किर्लोस्कर, विजय भोसले, एस. ए. कर्णिक, डी. बी. पाटील, नारायण साळुंखे, किशोर डावरे, गजानन भराटे, तसेच रत्नाकर बॅँकेचे सुनील उलपे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.११ टक्केंच्यावर पगारवाढ देण्यास नकार पगारवाढीच्या संघटनांनी आतापर्यंत अनेकवेळा संप केला. मात्र, केंद्र सरकारला जाग आली नाही. २ डिसेंबर २०१४ रोजी उपकामगार आयुक्त यांच्यासमोर ‘आयबीए’ने ११ टक्केंच्यावर पगारवाढ देण्यास नकार दिला. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली.कराराची मुदत संपलीबॅँक अधिकारी, कर्मचारी यांच्या नवव्या वेतनवाढीच्या कराराची मुदत नोव्हेंबर २०१२ मध्ये संपली आहे; परंतु सरकारने या मुदतीकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे.