शिरोलीत ८० टक्के लसीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:31 IST2021-04-30T04:31:15+5:302021-04-30T04:31:15+5:30

शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून शिरोलीसह नागाव, हालोंडी, टोप, कासारवाडी, मौजे वडगाव या गावांतील ४५ वर्षांच्या वरील लोकांनी कोव्हिशिल्ड ...

80% vaccination completed in Shiroli | शिरोलीत ८० टक्के लसीकरण पूर्ण

शिरोलीत ८० टक्के लसीकरण पूर्ण

शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून शिरोलीसह नागाव, हालोंडी, टोप, कासारवाडी, मौजे वडगाव या गावांतील ४५ वर्षांच्या वरील लोकांनी कोव्हिशिल्ड लस घेतली आहे.

शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अँड्र्युज, सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण यांनी व्यापक स्वरूपात लसीकरण मोहीम राबविली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी स्वॅब तपासणी केली जात आहे. तसेच शिरोली परिसरातील गावांमध्ये अँटिजेन टेस्टची मोहीम सुरू केली आहे.

पहिल्या टप्प्यात गावातील व्यापारी, दुकानदार, भाजी विक्रेते तसेच गावातून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांचीही अँटिजेन टेस्ट केली जाणार आहे.

फोटो : २९ शिरोली लसीकरण

ओळी :

शिरोली येथील शिवानी मंगल कार्यालयात लसीकरणप्रसंगी उद्योजक राजू यादव, उपसरपंच सुरेश यादव, महेश चव्हाण, उर्मिला जाधव, महेश सूर्यवंशी उपस्थित होते.

Web Title: 80% vaccination completed in Shiroli