शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे सापडली बहामनीकालीन नाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 19:01 IST

शाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे जेसीबीच्या सहायाने शेत जमिनीचे सपाटीकरण करीत असताना बहामनीकालीन  ७१६ नाण्यांचे गुप्तधन सापडले.

ठळक मुद्देशाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे सापडली बहामनीकालीन नाणीपुरातत्व विभागाच्या सहायक संचालकांशी पत्र व्यवहार

कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे जेसीबीच्या सहायाने शेत जमिनीचे सपाटीकरण करीत असताना बहामनीकालीन  ७१६ नाण्यांचे गुप्तधन सापडले.

उपकोषागार अधिकाऱ्यांकडे सुरक्षा कक्षामध्ये ही नाणी ठेवली असून पुरातत्व विभागाच्या सहायक संचालकांशी याबाबत पत्र व्यवहार केला आहे, अशी माहिती शाहूवाडीचे तहसिलदार गुरु बिराजदार यांनी दिली.जमीन मालक विनायक बापुसो पाटील हे गट क्र. १८६ आपल्या शेत जमिनीमध्ये २५ मे पासून विकास पाटील, उत्तम पाटील यांच्या समवेत जेसीबीच्या माध्यमातून जमिनीचे सपाटीकरण करत होते. यावेळी जमिनीत असणारे मडके फुटून आतमधील असणारी नाणी सापडली. 

ही नाणी पाटील यांनी शेतामधील घरात असणाऱ्या लोखंडी कपाटात नायलॉन पोत्यामध्ये आणि टीशर्टमध्ये मातीच्या मडक्याचे तुटलेले तुकडे ठेवले होते. याबाबत पाटील यांनी काल सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची कार्यालयात समक्ष भेट घेवून त्यांना सापडलेल्या गुप्तधनाबाबत माहिती दिली.त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दिलेल्या आदेशानुसार काल रात्री उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस निरीक्षक, करंजफेणचे मंडळ अधिकारी, अणुस्कुराचे तलाठी, तीन पंच आणि जमीन मालक यांच्या समवेत रात्री ३ वाजेपर्यंत गुप्तधन सापडलेल्या ठिकाणाची पाहणी करुन पंचनामा केला व नाणी ताब्यात घेतली.सापडलेले गुप्तधन व मातीचे तुटलेले तुकडे याची मोजमाप करण्यात आली. त्यामध्ये अंदाजे २ सें.मी. व्यासाची व २ मि.मी. जाड अशी एकूण ७१६ नाणी आणि मडक्याचे १९ तुकडे असल्याचे दिसून आले. हे गुप्तधन लोखंडी पेटीमध्ये सिलबंद करण्यात आले आहे.

याबाबत अधिक चौकशी करण्यात येत असून, सापडलेले मडके व नाणी यांचे आयुष्यमान व कालावधी कार्बन डेटींगच्या माध्यमातून करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी देसाई यांनी दिले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण