प्रफुल्लच्या कुटुंबियांसाठी ५५ हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:23 IST2021-05-16T04:23:09+5:302021-05-16T04:23:09+5:30

कोल्हापूर : प्रसिद्ध ढोलकीपटू ऱ्हिदम आर्टिस्ट प्रफुल्ल शेंडगे यांच्या निधनानंतर निराधार झालेल्या कुटुंबियांसाठी गायक शिक्षक मंचच्या वतीने ५५ हजारांची ...

55,000 help for Prafulla's family | प्रफुल्लच्या कुटुंबियांसाठी ५५ हजारांची मदत

प्रफुल्लच्या कुटुंबियांसाठी ५५ हजारांची मदत

कोल्हापूर : प्रसिद्ध ढोलकीपटू ऱ्हिदम आर्टिस्ट प्रफुल्ल शेंडगे यांच्या निधनानंतर निराधार झालेल्या कुटुंबियांसाठी गायक शिक्षक मंचच्या वतीने ५५ हजारांची मदत करण्यात आली. ‘प्रफुल्लची आठवण’ या नावाने सुरू करण्यात आलेल्या व्हॉटस्‌ॲप ग्रुपच्या माध्यमातून अर्थसाहाय्याचे आवाहन करण्यात आले होते.

सेवानिवृत्त सहायक शिक्षण संचालक संपत गायकवाड यांच्या हस्ते संदेश गावंडे यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द करण्यात आली. शिक्षक मंचने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गायक शिक्षक मंचमधील सदस्यांनी यासाठी सहकार्य केले. यावेळी गायक पंचायतीचे प्रमुख राजेंद्र कोरे, बाळ डेळेकर, रवींद्र सूर्यवंशी, अमर चोपडे, सहदेव कांबळे, आर. ए. कांबळे, अजित कांबळे उपस्थित होते. यासह कलाकारांच्या वतीनेदेखील प्रफुल्लच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

--

फोटो नं १५०५२०२१-कोल-प्रफुल्ल शेंडगे मदत

ओळ : ढोलकीपटू प्रफुल्ल शेंडगे यांच्या निधनानंतर निराधार झालेल्या कुटुंबियांसाठी गायक शिक्षक मंचच्या वतीने ५५ हजारांची मदत करण्यात आली.

--

Web Title: 55,000 help for Prafulla's family