शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

हमालीतील ४० पैसे आता महिला मजुरांना

By admin | Updated: December 13, 2015 01:31 IST

बाजार समिती : कांदा-बटाटा मार्केटमधील गुंता सुटला

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये महिला मजुरांच्या मजुरीवरून निर्माण झालेला गुंता अखेर शनिवारी सुटला. हमालीतील ४० पैसे कपात करून त्यामध्ये अडत्यांनी थोडे पैसे घालून महिलांंची मजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर कांदा-बटाट्याचे सौदे पूर्ववत सुरू झाले. कांदा-बटाटा मार्केटमध्ये सौद्यासाठी प्लॅटफॉर्मवर फोडलेली पोती परत भरण्यास हमालांनी नकार दिल्याने शुक्रवारी सौदे बंद होते. हमाली वाढवून दिल्याने समितीच्या नियमाप्रमाणे हमालांनीच काम करावे, अशी मागणी अडत्यांची होती; पण हे काम महिला मजुरांकडून आतापर्यंत करून घेत होता, मग आताच का नियमावर बोट ठेवता, असा पवित्रा घेऊन हमालांनी गोडावूनमध्येच सौदा काढावा, अशी मागणी केली. यामुळे शुक्रवारी सौदे बंद पडले होते. यावर शनिवारी काही दुकानात प्लॅटफॉर्मवर कांदा ओतला होता, तर काही ठिकाणी गोडावूनमध्ये ठेवल्याने शेतकरी पुन्हा समितीत आले. त्यानंतर बाजार समिती सभापती परशराम खुडे, उपसभापती विलास साठे, सचिव विजय नायकल, सहायक सचिव मोहन सालपे, विभागप्रमुख, अडते, हमाल प्रतिनिधी यांच्याशी चर्चा झाली. यामध्ये हमालांना प्रत्येक पोत्यामागे ४ रुपये ४० पैसे दिले जातात. त्यातील ४० पैसे कपात करून महिला मजुरांना द्यायचे, त्यामध्ये अडत दुकानदारांनी पैसे घालून सौद्यासाठी ओतलेली पिशवी भरण्याचे काम करणाऱ्या महिला मजुरांना पैसे द्यायचे, असा निर्णय घेण्यात आला. हा तोडगा अडते व हमालांना मान्य झाल्याने सौदे पूर्ववत सुरू झाले.