इचलकरंजी : महानगरपालिका मतमोजणीला सुरुवात झाली असून आता हाती आलेल्या निकालानुसार भाजपचे 4 तर शिव शाहू विकास आघाडीचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपचे मनोज हिंगमिरे, मनिषा कुपटे, मोनाली मांजरे, दिलिप झोळ विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिव शाहू विकास आघाडीचे 4 उमेदवार विजयी झाले. अमृता चौगुले, नंदकुमार पाटील, मदन कारंडे, क्रांती आवळे विजयी झाल्याने समर्थकांनी जल्लोष केला. इचलकरंजीत भाजप आणि शिव शाहू आघाडीत मुख्य लढत झाली होती.
भाजप आघाडीवर
महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत संत गतीने सुरू आहे. दुपारी सव्वा बारा वाजले तरी दुसऱ्या फेरीपर्यंतच निवडणूक विभागाला मतमोजणीत मजल मारता आली आहे. पहिल्या फेरीमध्ये भाजप 44 तर शिव शाहू विकास आघाडी 20 जागावर आघाडी होती तर उद्धव सेनचा एक उमेदवार आघाडीवर होता.
महापालिका निवडणुकीचे प्रक्रिया अत्यंत संत गतीने सुरू आहे त्यामुळे उमेदवाराबरोबरच कार्यकर्ते यांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला असला तरी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत दोन फेरीचा निकाल देता आला आहे.
पहिल्या फेरीमध्ये भाजपने 44 तर शिव शाहू आघाडीने वीस जागावर आघाडी घेतली आहे. उद्धव सेनेचे प्रभाग क्रमांक पाच मधील उमेदवार हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये सात प्रभागांचा निकाल समोर आला आहे त्यामध्ये भाजपचे 25 तर शिव शाहू आघाडीचे 3 उमेदवार आघाडीवर आहेत.
Web Summary : In Ichalkaranji Municipal Corporation elections, BJP and Shiv Shahu Alliance secured four seats each. BJP won in Ward 4, while Shiv Shahu Alliance triumphed in Ward 7. The election witnessed a 68% voter turnout.
Web Summary : इचलकरंजी नगर निगम चुनावों में, भाजपा और शिव शाहू गठबंधन ने चार-चार सीटें हासिल कीं। भाजपा ने वार्ड 4 में जीत हासिल की, जबकि शिव शाहू गठबंधन ने वार्ड 7 में जीत हासिल की। चुनाव में 68% मतदान हुआ।