शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेकडून ३६ जणांंना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

By admin | Updated: September 5, 2015 00:26 IST

सहाजणांना विशेष पुरस्कार : राड्यातील शिक्षकांना वगळले

कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेतर्फे दिलेल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या ३६ आणि विशेष पुरस्कारप्राप्त सहाजणांची नावे शुक्रवारी जाहीर करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, शिक्षण सभापती अभिजित तायशेटे यांनी पत्रकार परिषदेत नावाची घोषणा केली. शिक्षक बँकेमधील राड्यातील शिक्षकांना पुरस्कार मिळू नये, याकडे कटाक्षाने लक्ष दिल्याचेही त्यांनी सांगितले.सीईओ सुभेदार व तायशेटे म्हणाले, पाच सप्टेंबर या शिक्षक दिनी प्रत्येक वर्षी जिल्हा परिषदेतर्फे पुरस्कार दिले जातात. १२ डिसेंबर २००० च्या शासन निर्णयानुसार स्वयंमूल्यमापनानुसार पुरस्काराची निवड करण्याचा आदेश आहे. त्यानुसार शिक्षकांनी स्वत: स्वयंमूल्य प्रपत्रे भरून दिली. एकूण ४ हजार ५९५ शिक्षकांनी प्रपत्रे भरून दिली. त्यांची पडताळणी करण्यात आली. तालुकास्तरीय मूल्यमापन समितीद्वारे प्रत्यक्ष शाळास्तरावर भेट देऊन पाहणी करण्यात आली. काही शाळेतील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून संबंधित शिक्षकांबद्दल मत जाणून घेतले. प्रत्येक तालुक्यातील प्रथम तीन क्रमांक निश्चित करण्यात आले. जिल्हास्तरीय समितीतर्फे तालुका पातळीवरून आलेल्या नावांची छाननी करण्यात आली. त्यांतील पात्र असलेल्यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कार वितरणाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. प्राथमिक शिक्षक बँकेतील राड्यात सहभागी शिक्षकांना पुरस्कार मिळू नये याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. पारदर्शकपणे निवड करण्याचा प्रयत्न केला आहे. पुरस्कार वितरणाला मुहूर्त कधी ? --गेल्या वर्षी जाहीर केलेल्या पुरस्कारांचे वितरण करण्यास प्रशासनाला वर्षभरात मुहूर्त सापडलेला नाही. तेवढ्यातच यंदाचेही पुरस्कार पुन्हा जाहीर केले आहेत. त्यामुळे प्रशासनाला पुरस्कार वितरण करण्यासाठी सवड कधी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षक व शाळा (विद्यामंदिर) असे - मुख्याध्यापक शामराव कांबळे (देवर्डे, ता. आजरा), पदवीधर अध्यापक प्रकाश पाटील (शिनोळी खुर्द, ता. चंदगड), अध्यापक रघुनाथ शिंदे (अणदूर, ता. गगनबावडा), विषयशिक्षक सुहास शिंत्रे (वडरगे, ता. गडहिंग्लज), मुख्याध्यापक अशोक वसगडे (यळगूड, ता. हातकणंगले), पदवीधर अध्यापक मारुती लांबोरे (गर्जन, ता. करवीर), अध्यापक संजय दाभाडे (व्हन्नूर, ता. कागल), विषय शिक्षक सुभाष नारकर (पिसात्री, ता. पन्हाळा), पदवीधर अध्यापक शशीकुमार पाटील (अर्जुनवाडा, ता. राधानगरी), अध्यापिका राजश्री काळे (शिंपू, ता. शाहूवाडी), विषयशिक्षक नवीद पटेल (अकिवाट, ता. शिरोळ), अध्यापक चिदंबर चित्रगार (खानापूर, ता. भुदरगड), विशेष पुरस्कार सुनील देसाई (नवरसवाडी, ता. भुदरगड), तानाजी रानमाळे (कपिलेश्वर, ता. राधानगरी).