शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघाची जागा देण्यात १५ लाखांचा डल्ल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 12:44 IST

शेतकरी सहकारी संघाने भाडेतत्त्वावर घेतलेली राजारामपुरीतील मिरचीपूड विक्री केंद्राची जागा मूळ मालकाला परत देण्यात संघाचे मुख्य व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ यांनाच जास्त रस होता, असे उपलब्ध कागदपत्रांवरून पुढे आले आहे.

ठळक मुद्देशेतकरी संघाची जागा देण्यात १५ लाखांचा डल्ल्याचा संशयराजारामपुरीतील जागा : संचालक मंडळाच्या बैठकीत खडाजंगी चर्चा

विश्र्वास पाटील कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाने भाडेतत्त्वावर घेतलेली राजारामपुरीतील मिरचीपूड विक्री केंद्राची जागा मूळ मालकाला परत देण्यात संघाचे मुख्य व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ यांनाच जास्त रस होता, असे उपलब्ध कागदपत्रांवरून पुढे आले आहे.

संघाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना व पॅनेलप्रमुखांना हाताशी धरून हा व्यवहार झाला आहे. त्यामध्ये किमान १५ लाखांचा डल्ला मारला असल्याची माहिती पुढे येत आहे. संचालक मंडळाच्या मंगळवारी (दि. ३) झालेल्या बैठकीत यावरून मोठे वादंग माजले. संचालक मंडळाची मासिक सभा येत्या ११ तारखेला होत आहे. त्यामध्ये यावरून अध्यक्ष-उपाध्यक्षांसह व्यवस्थापकांनाही जाब विचारण्यात येणार आहे.मंगळवारी झालेल्या बैठकीस सत्तारूढ गटाचे नेते व माजी अध्यक्ष युवराज पाटील, संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने, उपाध्यक्ष भैय्यासाहेब भुयेकर, व्यवस्थापक निर्मळ, संचालक सर्वश्री. राजू पाटील टाकवडेकर, बाळकृष्ण भोपळे, शशिकांत पाटील-चुयेकर, जी. डी. पाटील, विजयकुमार चौगले, व्यंकाप्पा भोसले हे उपस्थित होते.

या बैठकीत अध्यक्ष-उपाध्यक्षांसह व्यवस्थापकांच्याही राजीनाम्याची जोरदार मागणी झाली. संघाने राजारामपुरीतील (सि.स.नं. १७३७, ई वॉर्ड) ही १७० चौरस फूट जागा जागामालक अजित रामचंद्र तावडे यांच्याकडून १९९१ ला सुरुवातीला औषध दुकानासाठी भाड्याने घेतली. त्यानंतर तिथे मिरचीपूड विक्री केंद्र सुरू केले. गेली आठहून अधिक वर्षे हे केंद्र सुरू होते. महिन्याला सरासरी लाख रुपयांची उलाढाल तिथे होत होती.

या गाळ्याच्या संघाने गेली १० वर्षे भाडे न दिल्याने व ही इमारत विकसित करणार असल्याने ती परत द्यावी, अशी मागणी अजित तावडे यांच्यावतीने त्यांचे भाऊ व वटमुखत्यार किशोर तावडे यांनी संघाकडे ८ मार्च २०१९ रोजी केली. त्याचा आधार घेऊन संघाने १२ नोव्हेंबर २०१९ रोजी ही जागा मूळ मालक तावडे यांच्या ताब्यात दिली. ही जागा ताब्यात देताना ११ नोव्हेंबर २०१९ च्या संचालक मंडळाच्या बैठकीत तसा ठराव झाल्याचे सांगण्यात येते; परंतु बहुतांश संचालकांचे असा कोणताच ठराव झाला नसल्याचे म्हणणे आहे.

व्यवस्थापक निर्मळ यांनी या जागेची कागदपत्रे सापडत नसल्याने आपण ही जागा त्यांची त्यांना परत देऊया, असा उदार दृष्टिकोन बाळगला आहे; परंतु जागेचे वटमुखत्यारपत्र व तत्सम अन्य कागदपत्रे संघाच्या मुख्यालयातच उपलब्ध आहेत. ही कागदपत्रे काही संचालकांनी मंगळवारच्या बैठकीत चक्क अध्यक्ष माने यांच्या पुढ्यात टाकली. त्यावर त्यांनी हा निर्णय घेण्यात माझी चूक झाल्याची कबुली दिली.

अध्यक्षच जर असे बैठकीत सांगत असतील तर मग संघ नेमका चालविते कोण हा प्रश्न पुढे आला आहे. संघाच्या मोक्याच्या जागा त्यांचे मालक शोधून त्यांच्याशी अर्थपूर्ण व्यवहार करून खासगी मालकांच्या घशात घालण्यासाठी काहीजण प्रयत्नशील असल्याची चर्चा संघाच्या वर्तुळात आहे. संघाचे नेते आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांनी आपण ज्यांना निवडून दिले, ते लोक काय करतात, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

किती ही तत्परता...संचालक मंडळाच्या बैठकीच्या इतिवृत्तात नंतर जागा देण्यासंबंधीचा बोगस ठराव घुसविण्यात आल्याचा संचालकांचा आरोप आहे. बैठक ११ नोव्हेंबरला झाली व लगेच दुसऱ्या दिवशीच निर्मळ यांनी जागा ताब्यात देत असल्याचे पत्र स्वत:च जागामालकांना दिले आहे. हे निर्मळ संघाचे व्यवस्थापक आहेत की जागामालकाचे वटमुखत्यार अशी शंका यावी, असा हा व्यवहार झाला आहे.

मी दवाखान्यात आहे. त्यामुळे मला या क्षणाला काही माहिती देता येणार नाही. मी ‘लोकमत’शी या विषयावर आज, गुरुवारी बोलू शकेन.- आप्पासाहेब निर्मळ, मुख्य व्यवस्थापक,शेतकरी सहकारी संघ

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर