इचलकरंजीत २९ पॉझिटिव्ह दाम्पत्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:27 IST2021-04-23T04:27:18+5:302021-04-23T04:27:18+5:30

इचलकरंजी : शहरात विविध २२ ठिकाणी २९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. बावणे गल्लीतील ८५ वर्षीय पुरूष व ७५ ...

29 positive couples die in Ichalkaranji | इचलकरंजीत २९ पॉझिटिव्ह दाम्पत्यांचा मृत्यू

इचलकरंजीत २९ पॉझिटिव्ह दाम्पत्यांचा मृत्यू

इचलकरंजी : शहरात विविध २२ ठिकाणी २९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. बावणे गल्लीतील ८५ वर्षीय पुरूष व ७५ वर्षीय दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दत्त नगर ३, षटकोन चौक, वाल्मिकी नगर, सोलगे मळा, राजराजेश्वरी नगर, शहापूर येथील प्रत्येकी दोन, आमराई रोड, गुरूकन्नन नगर, शांती नगर, स्टार नगर, लक्ष्मी मार्केट, सावली सोसायटी, जुना सांगली नाका, वेताळ पेठ, स्वामी अपार्टमेंट, महात्मा फुले सोसायटी, जयभीम नगर, भोनेमाळ, कोनार्क अपार्टमेंट, टाकवडे वेस, आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत चार हजार ६८९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, चार हजार १२० जण बरे झाले आहेत. सध्या ३५८ जण उपचार घेत आहेत तर मृत्यूसंख्या २११वर पोहोचली आहे.

Web Title: 29 positive couples die in Ichalkaranji