शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

२७२ खेड्यांचा अन् ३६ वाड्यांचा समावेश

By admin | Updated: October 5, 2014 23:30 IST

गटा-तटाचेच राजकारण : राजकीय पक्षांचा प्रभाव कमी

राम मगदूम-- गडहिंग्लजजिल्ह्याच्या दक्षिणेकडील संपूर्ण ग्रामीण, डोंगरी व दुर्गम मतदारसंघ. पुनर्रचनेत संपूर्ण चंदगड तालुक्यासह गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी, महागाव, नूल व हलकर्णी आणि आजरा तालुक्यातील कोळींद्रे जिल्हा परिषद मतदारसंघ मिळून हा नवीन मतदारसंघ तयार झाला आहे. हिटणीपासून पारगडपर्यंत आणि विटे-खानापूरपासून शिनोळीपर्यंत सुमारे १२५ ते १५० किलोमीटर इतका विस्तीर्ण मतदारसंघ आहे. यामध्ये तब्बल २७२ महसुली गावे आणि ३६ वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे.नव्या मतदारसंघाच्या पहिल्या निवडणुकीत बाबासाहेब कुपेकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे बंडखोर गोपाळराव पाटील आणि अपक्ष उमेदवार भरमू पाटील व नरसिंगराव पाटील, ‘स्वाभिमानी’चे राजेंद्र गड्यान्नावर, ‘रिडालोस’चे अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे असा बहुरंगी सामना झाला. तरीही कुपेकरांनीच बाजी मारली. पत्नी संध्यादेवींनाही पोटनिवडणुकीत साथ मिळाली.दोन दशके गडहिंग्लज उपविभागात स्व. कुपेकर यांचाच विशेष प्रभाव राहिला. गडहिंग्लजमध्ये स्व. कुपेकर, स्व. राजकुमार हत्तरकी, श्रीपतराव शिंदे, किसनराव कुराडे, प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, संग्रामसिंह नलवडे व राजेंद्र गड्यान्नावर यांचे गट तर चंदगडमध्ये नरसिंगराव पाटील, भरमू पाटील, गोपाळराव पाटीलबरोबरच नितीन पाटील व संभाजीराव देसाई-शिरोलीकर यांचे गट, तर आजऱ्यात जयवंतराव शिंपी, रवींद्र आपटे, विष्णूपंत केसरकर, अशोक चराटी, मुकुंदराव देसाई, अंजना रेडेकर यांचे गट कार्यरत आहेत.स्व. कुपेकरांच्या पश्चात संध्यादेवीप्रमाणेच संग्रामसिंह कुपेकरांनीही गट करण्याचा प्रयत्न केला. नेसरी जि. प. मतदारसंघात राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीय ‘शाहू आघाडी’ कार्यरत आहे. महाडिक, सतेज पाटील, विनय कोरेगडहिंग्लज विभागात महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक, सतेज पाटील, विनय कोरे यांना मानणारा मतदारदेखील या भागात आहे. त्यांचे स्वतंत्र गटही या विभागात कार्यरत आहेत. अल्प भू-धारकांची संख्या अल्पभू-धारक शेतकऱ्यांची संख्या या मतदारसंघात अधिक आहे. चित्री व फाटकवाडी या प्रकल्पासह लहान-मोठ्या तलावामुळे सिंचनक्षेत्रात वाढ झाली असली तरी पाण्याच्या लाभार्थ्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे शेतमजुरी व पशुपालनावर गुजराण करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.निकाल फिरवणारी गावे व तेथील मतदाननूल - ५२७५, हलकर्णी - ४९३३, हसूरचंपू - ३२६२, महागाव- ६२१३, नेसरी ५३६९, भडगाव -६५४८, तेरणी- ३५४७, चंदगड - ७०६४, तुडिये - २८८६, माणगाव - ३७९५, कोवाड - २६७३, कुदनूर - ३१०४, कालकुंद्री - २७६१, तुर्केवाडी - २६१०निर्णायक मते : लिंगायत व बेरड समाजकळीचे मुद्दे  --वादग्रस्त एव्हीएच प्रकल्प आणि सलग चार वर्षे बंद पडलेला दौलत साखर कारखाना.सत्तेची वाटणी  --गोकुळ संचालक - ३ संचालक - स्व. राजकुमार हत्तरकी (गडहिंग्लज), रवींद्र आपटे (आजरा) व दीपक पाटील (चंदगड) गडहिंग्लज साखर कारखाना - श्रीपतराव शिंदे गट - ७, प्रकाश चव्हाण गट - १५, - आजरा साखर कारखाना - राष्ट्रवादी - १४, काँगे्रस - ५, स्वाभिमानी - २, शिवसेना - १, --दौलत साखर कारखाना - गोपाळराव पाटील गटाची सत्ता संध्यादेवी कुपेकर - जि.प.सदस्य ४, पं.स.सदस्य ९ --भरमूअण्णा पाटील- जि.प.सदस्य २, पं.स.सदस्य ३ -नरसिंगराव पाटील - जि.प.सदस्य १, पं.स.सदस्य ३ --संग्राम कुपेकर - जि.प.सदस्य १, पं.स.सदस्य ३देसाई-शिरोलीकर - जि.प.सदस्य १, पं.स.सदस्य ० --गडहिंग्लज बाजार समिती : गटनिहाय संचालक असे - नरसिंगराव पाटील - २, बाबा कुपेकर - ५, गोपाळराव पाटील - २, राजकुमार हत्तरकी - २, सदाशिव मंडलिक - १, विक्रमसिंह घाटगे - १, श्रीपतराव शिंदे - १, प्रकाश चव्हाण - १, भरमू पाटील - १, जयवंत शिंपी - १, अशोक चराटी - १, रवींद्र आपटे - १, मतदारसंघातील प्रश्नदोन औद्योगिक वसाहत सुरूच नसल्याने येथे बेरोजगारीचा प्रश्न मोठा. चंदगड तालुक्यातील गावजोड रस्ते व अंतगर्त रस्ते.गडहिंग्लजच्या पूर्वभागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न.पुनर्वसन रखडल्यामुळे आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पाचे काम रेंगाळले आहे. तेथील मतदान : नूल - ५२७५, हलकर्णी - ४९३३, हसूरचंपू - ३२६२, महागाव- ६२१३, नेसरी ५३६९, भडगाव -६५४८, तेरणी- ३५४७, चंदगड - ७०६४, तुडिये - २८८६, माणगाव - ३७९५, कोवाड - २६७३, कुदनूर - ३१०४, कालकुंद्री - २७६१, तुर्केवाडी - २६१०चाकरमान्यांची भूमिका महत्त्वाचीगडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतून पोटापाण्यासाठी गुजरात, मुंबई, पुणे व इचलकरंजीला गेलेल्यांची संख्याही लक्षणीय आहे. गिरणी कामगारांची संख्याही याठिकाणी मोठी आहे. प्रत्येक निवडणुकीत या चाकरमान्यांची भूमिका नेहमीच महत्त्वपूर्ण राहिली असून, त्यांची गठ्ठा मते मिळविण्यासाठी नेहमीच चढाओढ असते.