शहरं
Join us  
Trending Stories
1
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
2
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
3
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
4
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
5
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
6
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
7
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
8
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
9
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
11
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
12
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
13
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
14
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
15
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
16
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
17
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
18
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
19
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
20
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी महापालिका निवडणुकीत चर्चेतील २१ उमेदवार करोडपती; सर्वांत श्रीमंत उमेदवार कोण... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 14:12 IST

संपत्तीच्या विवरणातून कौटुंबिक आर्थिक स्थिती स्पष्ट

अरुण काशीद

इचलकरंजी : महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून शहराचे नेतृत्व करण्यासाठी उभे राहिलेल्या अनेक उमेदवारांची कौटुंबिक संपत्तीची उड्डाणे कोटीच्या घरात आहेत. त्यातील चर्चेतील २१ जण करोडपती आहेत. संजय महादेव कांबळे यांच्या कुटुंबाची सर्वाधिक ३२ कोटी रुपये संपत्ती आहे, तर सदाशिव अण्णाप्पा मलाबादे यांच्या संपत्तीचे विवरण निरंक आहे.

निवडणुकीस उभे राहणाऱ्या उमेदवारास संपत्तीचे सविस्तर विवरण द्यावे लागते. त्यामध्ये शेती, अकृषक जमीन, व्यापार, निवासी गाळे, घर, देणगी, इतर उत्पन्न, दागिने, विविध ठिकाणी केलेली गुंतवणूक, वित्तीय कंपन्या पोस्ट ऑफिस, एलआयसी, बचत पत्र, बक्षीसपत्र, आदींचा समावेश आहे. उमेदवारांनी संपत्तीच्या तपशिलाचा घोषवारा आपल्या शपथपत्रात दिला आहे. 

वाचा : इचलकरंजी महापालिकेवर कोल्हापूर व्हाया मुंबईचे लक्ष

यामध्ये प्रभाग क्रमांक १२ अ मधून निवडणुकीस उभे राहिलेले कांबळे यांनी सर्वाधिक संपत्ती दाखवलेली आहे, तर सामाजिक कार्य करणारे व प्रभाग १० ड मधून निवडणुकीच्या रिंगणात असलेले मलाबादे यांनी आपल्या एकूण मालमत्तेच्या विवरणामध्ये निरंक लिहिले आहे. त्यांच्या नावावर ना घर आहे, ना पासबुकात बॅलेन्स. जे उमेदवार चर्चेत आहेत, त्यातील सर्वांची संपत्ती कोटीच्या घरातच आहे. काहींची संपत्ती स्वत:च्या नावावर, तर काहींची पत्नी, कुटुंबीयांच्या नावावर आहे. याची सविस्तर माहिती घोषणापत्रात दिली आहे.

वाचा: सतेज पाटील यांना निकालादिवशीच समजेल भाजपची ‘बी’ टीम कोण, हसन मुश्रीफ यांचा पलटवार

चर्चेतील उमेदवार आणि त्यांचे उत्पन्न

संजय महादेव कांबळे - ३२ कोटी १७ लाख ७२ हजार २७०.
अशोक रामचंद्र जांभळे - १८ कोटी ४१ हजार ७२३.
राजू शंकर चव्हाण - १५ कोटी ८३ लाख ६५ हजार ८८७.
मदत सीताराम कारंडे - १३ कोटी ८६ लाख ९९ हजार ३१.
अनिलकुमार देवकरण डालिया (डाळ्या) - १२ कोटी ३३ लाख ६८ हजार २९५.
सुरेखा अजित जाधव - ८ कोटी ९३ लाख ९१ हजार ७२१.
सुहास अशोकराव जांभळे - ७ कोटी ७७ लाख २४ हजार २९५.
विजया सुनील महाजन - ६ कोटी ८५ लाख ९० हजार ४६५.
अब्राहम किसन आवळे - ६ कोटी २२ लाख ७३ हजार ३००.
संजय शंकरराव तेलनाडे - ५ कोटी ८४ लाख २३ हजार ७२२.
उदय आनंदा धातुंडे - ४ कोटी ५६ लाख ७० हजार ५९१.
रणजित दिलीप लायकर - ४ कोटी ११ लाख २७ हजार ९६.
मेघा दादासो भाटले - ३ कोटी ३२ लाख ३६ हजार ४३१.
संतोष महावीर जैन - २ कोटी ९६ लाख ७१ हजार ५८२.
अभिषेक रमाकांत वाळवेकर - २ कोटी ८१ लाख ४३५.
अलका अशोक स्वामी - २ कोटी ७६ लाख १२ हजार ६८६.
ध्रुवती सदानंद दळवाई - २ कोटी २८ लाख ४२ हजार ११.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji Election: 21 Millionaire Candidates in Fray; Richest Revealed

Web Summary : Ichalkaranji municipal elections see 21 millionaire candidates. Sanjay Kamble's family leads with ₹32 crore assets. Sadashiv Malabade declares nil assets. Wealth details are self-declared.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६