शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मागील निवडणुकीतील १७ जण रिंगणाबाहेर राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : ‘गोकुळ’साठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी उद्या, सोमवारी होत असून पॅनलची बांधणी बऱ्यापैकी अंतिम टप्प्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : ‘गोकुळ’साठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी उद्या, सोमवारी होत असून पॅनलची बांधणी बऱ्यापैकी अंतिम टप्प्यात आहे. सत्तारूढ गटात पहिल्यांदाच किमान ११ नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असून त्यांच्याकडून १०, तर विरोधी आघाडीकडून तीन विद्यमान संचालकांना संधी मिळणार आहे. गेल्या निवडणुकीत विरोधी आघाडीच्या बहुतांश बिनीच्या शिलेदारांना घरीच बसावे लागणार, हे मात्र निश्चित आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने एकीकडे चिंतेचे वातावरण असताना, कोल्हापूर जिल्ह्यात मात्र कोरोनापेक्षा ‘गोकुळ’च्या निवडणुकीची उत्सुकता अधिक पाहावयास मिळते. त्याला कारणही तसेच असून ही निवडणूक मंत्री, आमदारांनी प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले असले तरी संधी कोणाला द्यायची, असा पेच नेत्यांसमोर आहे. एरव्ही सत्तारूढ गटातील प्रस्तापितांमुळे नवीन चेहऱ्यांना कमी संधी मिळायची. या वेळेला तीन वाढीव जागा व पाच विद्यमान संचालकांनी फारकत घेतल्याने नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते.

मागील निवडणुकीत जोखीम असतानाही नेत्यांनी संधी दिली म्हणून विरोधी आघाडीकडून अठरापैकी तब्बल चौदा नवीन चेहऱ्यांनी निवडणूक लढविली. प्रस्तापितांविरोधात निकराची झुंज दिली होती. गेली पाच वर्षे त्यांनी सतेज पाटील यांच्या रस्त्यावरील लढाईत साथ देत वातावरण निर्मिती केली. त्यातून ‘गोकुळ बचाव’बाबत दूध उत्पादकांसह ठरावधारकांमध्ये सहानुभूती तयार झाली. पाच वर्षे संघर्ष करणाऱ्यांना सोबत घेऊन पॅनेलची बांधणी होईल, असे वाटत असतानाच वारसदार पुढे आले आणि बिनीच्या शिलेदारांची नावे मागे पडू लागल्याने दूध संस्था प्रतिनिधीमध्येही अस्वस्थता आहे.

सत्तारूढ गटाकडून नऊ ते दहा, तर विरोधी आघाडीकडून तिघांना संधी मिळू शकते. सत्तारूढ गटाकडून किमान ११ नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.

तुमचे वारसदार, तर आमचे कार्यकर्ते

सत्तारूढ गटातून चेतन नरके, दीपक पाटील, धैर्यशील देसाई, अनुराधा पाटील, शौमिका महाडिक, उदय पाटील एवढ्याच थेट नेत्यांच्या घरांतील व्यक्तींना संधी मिळू शकते. उर्वरितपैकी किमान १२ कार्यकर्त्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न असून, तुमचे वारसदार तर आमचे कार्यकर्ते हा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो.