शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ११७४ खटले निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST

कोल्हापूर : जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी जिल्हाभर आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १२ हजार ६२५ दाखलपूर्व प्रकरणांपैकी सुमारे ...

कोल्हापूर : जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी जिल्हाभर आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १२ हजार ६२५ दाखलपूर्व प्रकरणांपैकी सुमारे ११७४ खटले तडजोडीने मिटवण्यात यश आले. त्यामध्ये १० कोटी १९ लाख ४३ हजारांची रक्‍कम भरपाई म्‍हणून दिली. बँक वसुली, कामगार वाद, वीज, पाणी प्रकरणे अशी ही प्रकरणे होती. शिवाय ३३ कौटुंबिक वादाची प्रकरणे मिटवून त्यांचे संसार पुन्‍हा जुळविण्‍यात यश आले.

न्‍यायालयात प्रलंबित नसलेल्या दाखलपूर्व प्रकरणी तडजोडीतून मिटविण्‍याच्‍या हेतूने या लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते. शनिवारी सकाळी प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही. व्‍ही. जोशी यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलनाने लोक अदालतीचा प्रारंभ झाला. जिल्‍हा न्‍यायाधीश बी. डी. शेळके यावेळी उपस्‍थित होते. दिवाणी न्‍यायालये, औद्योगिक व कामगार न्‍यायालये, कौटुंबिक न्‍यायालयासह सर्व न्‍यायालयात लोक अदालतीचे आयोजन केले होते. विधि सेवा प्राधिकरणच्या १३ समिती, ३९ पॅनेलद्वारे हे कामकाज सुरू होते.

कौटुंबिक वादातील ३३ खटल्‍यांत यशस्‍वी मध्‍यस्‍थी करून दिलजमाई झाली. सहकार कायद्यासंबंधी १२ खटले, कामगार न्‍यायालयाचा एक खटला मिटविला. दस्‍तऐवज कायदा कलम १३८ प्रमाणे आलेले ३४७ खटलेही तडजोडीने मिटविण्‍यात आले. प्रलंबित ५६८ व दाखलपूर्व ६०६ असे एकूण ११७४ खटले मिटवून त्यामध्ये १० कोटी १९ लाख ४३ हजारांची रक्‍कम मंजूर करण्‍यात आल्‍याची माहिती विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी दिली. विधि सेवाचे अधीक्षक आर. जी. मानेही यावेळी प्रमुख उपस्‍थित होते.

फोटो नं. १२१२२०२०-कोल-लोकअदालत

ओळ : जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने कोल्हापुरात शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्‌घाटन जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही. व्‍ही. जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी जिल्‍हा न्‍यायाधीश बी. डी. शेळके, सचिव पंकज देशपांडे, आर.जी. माने, आदी उपस्थित होते.

(तानाजी)