फुलेवाडीतील नागरिकांकडून स्मशानभूमीस १० हजार शेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:24 IST2021-05-17T04:24:01+5:302021-05-17T04:24:01+5:30

कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोड परिसरातील सर्व नागरिकांच्यावतीने विजयसिंह देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त पंचगंगा स्मशानभूमीस १० हजार शेणी व दोन टन ...

10,000 shins from the citizens of Phulewadi to the cemetery | फुलेवाडीतील नागरिकांकडून स्मशानभूमीस १० हजार शेणी

फुलेवाडीतील नागरिकांकडून स्मशानभूमीस १० हजार शेणी

कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोड परिसरातील सर्व नागरिकांच्यावतीने विजयसिंह देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त पंचगंगा स्मशानभूमीस १० हजार शेणी व दोन टन लाकूड सामाजिक भावनेतून देण्यात आले.

कोरोना परिस्थितीत पंचगंगा स्मशानभूमीस मृतदेह दहनासाठी शेणी व लाकडांची कमतरता भासू लागल्याने वाढदिवसावरील खर्च करण्यापेक्षा त्याच रकमेतून तसेच नागरिकांनी जमा केलेल्या शेणी व लाकडे स्मशानभूमीस देण्यात आली. करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या हस्ते व महापालिकेचे आरोग्यनिरीक्षक अरविंद कांबळे यांच्या उपस्थित हे साहित्य प्रदान करण्यात आले. यावेळी विजयसिंह देसाई, तानाजी फाले, हिराजी लांबोरे, बबलू फाले, राहुल कात्रट, ललन गायकवाड, अविनाश मोरे, नरेश तोरस्कर, विनोद सूर्यवंशी, महादेव मसूद, प्रकाश बोडके, तुकाराम खोंदल, अमर पाटील, बाळ पोवार, आदी उपस्थित होते.

फोटो नं. १६०५२०२१-कोल-केएमसी०१

ओळ : फुलेवाडी रिंगरोड परिसरातील नागरिकांच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीस १० हजार शेणी व दोन टन लाकडे देण्यात आली.

===Photopath===

160521\16kol_29_16052021_5.jpg

===Caption===

ओळ : फुलेवाडी रिंगरोड परिसरातील नागरीकांच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीस १० हजार शेणी व दोन टन लाकडे देण्यात आली.

Web Title: 10,000 shins from the citizens of Phulewadi to the cemetery