अँटिजेन चाचणीत मरगाई गल्लीत १० बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST2021-04-27T04:25:53+5:302021-04-27T04:25:53+5:30

लोकमत कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहराच्या विविध भागात सुरू असललेल्या अँटिजेन चाचणीत सोमवारी शिवाजी पेठेतील मरगाई गल्लीत दहा ...

10 infected in Margai alley in antigen test | अँटिजेन चाचणीत मरगाई गल्लीत १० बाधित

अँटिजेन चाचणीत मरगाई गल्लीत १० बाधित

लोकमत

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहराच्या विविध भागात सुरू असललेल्या अँटिजेन चाचणीत सोमवारी शिवाजी पेठेतील मरगाई गल्लीत दहा व्यक्ती, तसेच लाईनबाजार पोलीस लाईनमधील चार पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.

शहरात संचारबंदी असूनही नागरिक खरेदीच्या, तसेच औषधे आणण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करीत आहेत. कोरोनाची लक्षणे दिसून येत नसल्याने काही व्यक्ती संसर्ग वाढवीत असल्याचे आरोग्य विभागाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे रोज वेगवेगळ्या भागात जाऊन अचानक काही नागरीकांच्या कोरोनाची अँटिजेन चाचणी केली जात आहे.

लाईन बझार येथील पोलीस क्वाॅटरमधील पोलीस कर्मचाऱ्यांची मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यावेळी तेथील चार पोलीस कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर मरगाई गल्ली येथे १० नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

सोमवारी लाईन बझार येथील पोलीस वसाहतीत ११७ पोलीस कर्मचाऱ्यांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. यामध्ये ११३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. चार पोलीस कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शिवाजी पेठ येथील मरगाई गल्ली परिसरात कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये १४४ नागरिकांपैकी १३३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर १० नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रेल्वे स्थानक परिसरातील ५० चाचण्यापैकी तीन, जवाहरनगरातील ५३ पैकी एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.

या सर्व नागरिकांना आपणास कोरोना झाला आहे, याची कल्पनाही नव्हती. कोणतीही लक्षणे नसताना या चाचणीमुळे पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित नागरिक हादरून गेले. कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्यामुळे बाधितांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. वेळीच या चाचण्या झाल्या म्हणून किमान त्यांना समाजातील इतर नागरिकांपासून विलगीकरण करण्यात पालिकेला यश आले.

Web Title: 10 infected in Margai alley in antigen test