शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सावळाराम महाराज वनश्री टेकडीवर नाशिकच्या धर्तीवर बॉटनिकल गार्डन विकसीत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 14:34 IST

Botanical garden: आमदार राजू पाटील यांनी केली पाहणी. सकाळ संध्याकाळी अनेकजण फेरफटका मारण्याकरीता, व्यायामासाठी येतात. अनेक पक्षी प्रेमी या टेकडीवर पक्षी निरक्षणासाठी येतात. ही टेकडी प्रदूषणमुक्त आणि मोकळा श्वास घेण्यासाठी एक पर्वणी आहे.

कल्याण-कल्याण ग्रामीण भागातील दावडी, घारीवली, सोनारपाडा, भाल या गावांना लागून असलेल्या संत सावळाराम महाराज वनश्री टेकडीची मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आज पाहणी केली. या टेकडीवर नाशिकच्या धर्तीवर बॉटनिकल गार्डन विकसीत केले जाणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.

सकाळ संध्याकाळी फेरफटका मारण्याकरीता, व्यायामासाठी येतात. अनेक पक्षी प्रेमी या टेकडीवर पक्षी निरक्षणासाठी येतात. ही टेकडी प्रदूषणमुक्त आणि मोकळा श्वास घेण्यासाठी एक  पर्वणी आहे. व्यायामासाटी येणा:या मंडळींनी या टेकडीवर वनसंपत्ती जीवापाड जपली आहे. त्यामुळे या टेकडीवर वनराई फूलली आहे. काही नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आहे. या टेकडीवरील झाडा झुडपांना पाणी घातले जाते. या टेकडीचे संवर्धन झाले आहे. मात्र काही भूमाफियांनी आणि काही व्यसनी मंडळीनी या  टेकडीवर अतिक्रमण केले आहे. काही वेळेस या वनराईला काही अप्रवृत्ती असलेले लोक आग लावून तीन नष्ट करण्याचा प्रयत्न करतात.

मनसे आमदार पाटील यांनी त्यांच्या निवडणूक जाहिरनाम्यात वनराई विकास करण्यात येईल असे म्हटले होते. त्यानुसार या टेकडीचे संवर्धन करण्याकरीता आमदारांनी पुढाकार घेतला आहे. आज आमदार पाटील यांनी टेकडीची पाहणी केली. यावेळी आमदारांच्या हस्ते तूळशी रोप लावण्यात आले. यावेळी निसर्ग प्रेमींनी त्यांच्याकडे अनेक समस्या मांडला. टेकडीला संरक्षक कुंपण घालण्यात येईल. त्याठिकाणी भगीरथी कुंड आहे. त्याचे पुनरुजीवन करण्यात येईल.

झाडांना पाणी देण्यासाठी ठीपक सिंचन व पंपाचा व्यवस्था केली जाईल. त्यासाठी पाण्याच्या टाक्या बसविल्या जातील. ही टेकडी म्हणजे डोंबिवलीचे आरे आहे. हा हिरवा श्वास टिकवून ठेवण्यासाठी नाशिकच्या धर्तीवर याठिकाणी बॉटनिकल गार्डनही तयार केले जाईल असे आमदार पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलkalyanकल्याण