उद्धव सेनेचे ऋतूराज रसाळ यांचे केडीएमसीसमोर मुंडन आंदोलन, प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 23:16 IST2026-05-15T23:15:59+5:302026-05-15T23:16:09+5:30
सहाय्यक आयुक्त सविता हिले या बिल्डरला पाठीशी घालत असून हिले यांना महापालिका आयुक्त पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप करीत उद्धव सेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर संघटक ऋतूराज रसाळ यांनी कल्याण डाेंबिवली महापालिका मुख्यालयासमोर मुंडन केले. मुंडन आंदोलन करुन प्रशासनाचा जाहिर निषेध केला आहे.

उद्धव सेनेचे ऋतूराज रसाळ यांचे केडीएमसीसमोर मुंडन आंदोलन, प्रकरण काय?
कल्याण : कल्याण पूर्वेतील एका बिल्डरकडून नियमबाह्य काम करण्यात आले आहे. त्याच्या विरा्ेधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीची दखल घेतली जात नाही. सहाय्यक आयुक्त सविता हिले या बिल्डरला पाठीशी घालत असून हिले यांना महापालिका आयुक्त पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप करीत उद्धव सेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर संघटक ऋतूराज रसाळ यांनी कल्याण डाेंबिवली महापालिका मुख्यालयासमोर मुंडन केले. मुंडन आंदोलन करुन प्रशासनाचा जाहिर निषेध केला आहे.
ऋतूराज रसाळ हे गेल्या पाच दिवसापासून महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण करीत आहे. त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने अखेरीस रसाळ यांनी प्रशासनच्या विरोधात मुंडन आंदोलन केले. परप्रांतिय बिल्डरच्या बांधकामाबाबततीच परवानगी , नकाशे आदी सगळे काही सार्वजनिक करण्यात यावे. तसेच या प्रकरणात माहिती नाकारणारे अधिकारी यांची चाैकशी करुन त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात यावी. कल्याण पूर्वेत क्लस्टर योजना राबविली जात आहे. ही योजना राबविताना बिल्डरकडून मनमानी केली जात आहे. त्याच्याकडून जनसुनावणी घेतली जात नाही. या विविध मुद्यावर रसाळ यांनी त्यांचे उपोषण सहाव्या दिवशीही सुरु ठेवले आहे.