कल्याण : एक जण सफाई कामगाराचे काम करीत होता. तर दुसरा जण बिगारी काम करायचा. हे दोघेही काम करीत असताना त्या परिसरात रेकी करायचे. घर हेरायचे. त्या घरात त्यांच्याच पोटच्या मुलांना घरफोडी करायला सांगायचे. त्यांचा या घरफाेडीचा पर्दाफाश महात्मा फुले पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. त्यांच्याकडून २१ लाख ६० हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत केले आहे.
आरोपींची नावे विलास प्रकाश भालेराव (३९), कैलास विलास भालेराव (१९ ) आणि दीपक अशोक जाधव (४०) अशी आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालायने पोलिस कोठडी सुनावली आहे. अटक आरोपींपैकी विलास हा सफाईचे काम करतो. तर दीपक हा बिगारी काम करतो. दोघेही काम करीत असताना घरांची रेकी करायचे. रेकी करुन ज्या ठिकाणी घर चांगले आहे. त्या घरातच त्यांच्या मुलांना चोरी करायला लावायचे. विलासचा मोठा मुलगा कैलास याच्यासह विलास आणि दीपकची यांची दोन अल्पवयीन मुले चोरी करायची. यापैकी कैलास याच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात चोरीचा एक गुन्हा दाखल आहे. दोन अल्पवयीन मुलांपैकी एकाच्या विरोधात यापूर्वी विविध पोलिस ठाण्यात आठ आणि आत्ताचे चार असे एकूण १२ गुन्हे दाखल आहेत.
चोरीतून आलेल्या पैशातून कैलास आणि दोन अल्पवयीन मुले ही मौजमजा करायचे. चोरी केलेले सोन्या चांदीचे त्यांचे वडील विलास आणि दीपक या दोघांकडे विकायसाठी द्यायचे. कल्याण पश्चिमेतील रामबागेत राहणारे अरविंद पै यांच्या घरी ८ मे रोजी घरफाेडी झाली होती. त्यांच्या घरातील ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करीत असताना पोलिसांना हे त्रिकूट आणि दोन अल्पवयीन मुले हाती लागली असल्याची माहिती कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाने यांनी दिली आहे.
Web Summary : Kalyan police arrested three individuals who used their children for burglaries. The accused would scout locations and then have their children commit the thefts. Police recovered stolen jewelry worth ₹21.6 lakh and sent two minors to a juvenile detention center.
Web Summary : कल्याण पुलिस ने तीन लोगों को गिरफ्तार किया है जो अपने बच्चों का इस्तेमाल चोरी के लिए करते थे। आरोपी जगहों की रेकी करते थे और फिर अपने बच्चों से चोरी करवाते थे। पुलिस ने ₹21.6 लाख के चोरी के गहने बरामद किए और दो नाबालिगों को बाल सुधार गृह भेजा।