शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून राम मंदिर उभारणीसाठी ५ लाखांची देणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 12:18 IST

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी दिली देणगी

डोंबिवली: अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचा ऐतिहासिक क्षण जवळ येत असून राममंदिराच्या उभारणीत आपलाही खारीचा वाटा असावा, अशी देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही या मंदिर उभारणीत सक्रिय सहभागी होत पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे. डोंबिवली येथील गणेश मंदिरचे विश्वस्त मधुकर चक्रदेव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सुरेश फाटक, प्रदीप पराडकर यांचेकडे पाच लाख रुपयांचा धनादेश डॉ. शिंदे यांनी सुपूर्द केला. फुल ना फुलाची पाकळी या स्वरुपात मलाही राममंदिर उभारणीच्या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाले, अशी भावनिक प्रतिक्रिया डॉ. शिंदे यांनी दिली. अयोध्येतील राममंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं होतं. त्यानंतर आता राममंदिराच्या उभारणीसाठी वर्गणी अभियानाला सुरुवात झाली आहे. राममंदिर उभारणीसाठी क्राऊड फंडिंगद्वारे (लोकांकडून वर्गणी काढून) १० अब्ज रुपये जमा करण्याचा निर्धार विश्व हिंदू परिषदेने केला आहे. राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले असून मंदिर १००० वर्ष टिकावे, या दृष्टिकोनातून दगड आणि तांब्याचा उपयोग करत ते बांधले जाणार आहे. मंदिर उभारणीसाठी प्रदीर्घ लढा देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून प्रभू रामचंद्राला त्यांच्या जन्मस्थानी पुन्हा विराजमान होता येणार असल्याची भावना देशभरातील भाविकांमध्ये आहे. सध्या देशभरात राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेRam Mandirराम मंदिर