शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

जय भवानी, जय शिवाजी! कल्याणच्या ‘सह्याद्री रॉक अडव्हेंचर’ने सर केला ‘चंदेरी’ किल्ला, स्वच्छता मोहिमही राबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 17:54 IST

कल्याण-कल्याणच्या सह्याद्री रॉक अडव्हेंचर या गिर्यारोहक ग्रूपने काल शिवजयंतीचे औचित्य साधून चंदेरी किल्ला सर केला.

कल्याण-कल्याणच्या सह्याद्री रॉक अडव्हेंचर या गिर्यारोहक ग्रूपने काल शिवजयंतीचे औचित्य साधून चंदेरी किल्ला सर केला. या किल्ल्यावरील कचरा गोळा करुन तो गडाच्या खाली आणला. त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली.

कल्याणहून कजर्तकडे जाताना उजवीकडे सह्याद्रीची एक डोंगर रांग दिसते. वांगणी व बदलापूर रस्त्याच्या मधोमध डोंगररांगातून नाखिंड, चंदेरी, म्हैसमाळ, नवरी, बोर्यी, पेब  आणि माथेरानची रांग दिसते. या रांगेतच भलामोठा थोरला माथा उंचावलेला दिसतो. एक प्रचंड सुळका आहे. त्याच किल्ल्याचे नाव चंदेरी आहे. ग्रुपने काल सकाळी साडे सात वाजता किल्ल्याच्या चढाईला सुरुवात केली. ग्रुप दुपारी बारा वाजता किल्ल्यावर पोहचला होता. हा किल्ला चढाईसाठी अत्यंत कठीण आहे. चढाई करणा:याची शारीरीक परिक्षा घेणारा आहे. हा किल्ला जवळपास 2 हजार ३०० फूट इतका उंच आहे. हा किल्ला टेहाळणी किल्ला होता. या किल्ल्यावरुन वांगणी, बदलापूर, कजर्त, कल्याण र्पयतचा दूरवरचा परिसर टापूत येतो. त्याच बरोबर दुस:या बाजूला पनवेलची बाजू आहे. ती एका दृष्टीक्षेपात दिसून येते. किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा विराजमान आहे.

ग्रुपने किल्ल्यावर चढाई करतानाच वाटेत दिसणारा कचरा गोळा केला होता. तसेच किल्ला परिसराची स्वच्छता केली. किल्ल्याच्या मध्यभागी असेलल्या कुंडात कचरा व गाळ काढण्यासाठी ग्रुपने मानवी साखळी करुन कुंड स्वच्छ करण्याचे काम केले. या मोहिमेत ग्रुपचे भूषण पवार यांच्यासह पवन घुगे, दर्शन देशमुख, जयेश हरड, भूषण पवार, विकास जाडघे, स्वरूप गायकवाड, श्रवणी गायकवाड, देविदास गायकवाड, मंगेश नलावडे, सुरज देशमुख,उद्धव घरत आदी सहभागी झाले होते. भूषण पवार यांनी सांगितले की, शिवकार्य करीत असताना आनंद झाला. ग्रुपची स्थापना होऊन दोनच वर्ष झाली आहेत. कोरोना काळात मोहिम करता आली नाही. शिवजयंतीचे औचित्य साधून चंदेरी किल्ला स्वच्छ करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ग्रुप अशा प्रकारच्या आणखीन मोहिमा करणार आहे.

टॅग्स :Shivjayantiशिवजयंतीkalyanकल्याण