शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित मालमत्ताकर बिलांमुळेही रहिवाशांची घोर निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 23:18 IST

याआधीच्या बिलामध्ये घराचे वार्षिक करयोग्य मूल्य अवाजवी व चुकीच्या पद्धतीने नोंदविल्याचा आक्षेप रहिवाशांचा होता.

डोंबिवली : एमआयडीसी निवासी भागातील वाढीव मालमत्ताकर कमी करण्याचा निर्णय नोव्हेंबर महिन्यात झाला होता. मात्र, त्यानंतर वितरित केलेली सुधारित बिले पाहता रहिवाशांची घोर निराशा झाली आहे. यापूर्वी आलेली बिले ही चुकीचे करयोग्यमूल्य लावल्याने सात ते आठ पट वाढीव दराने आली होती. परंतु, सुधारित बिलांची रक्कम १५ ते २० टक्केच कमी झाल्याने रहिवाशांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. रहिवाशांची ही फसवणूक असून याबाबत पुनर्विचार केडीएमसी व लोकप्रतिनिधींनीही करावा, अशी विनंती डोंबिवली वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विवेक देशपांडे आणि सचिव राजू नलावडे यांनी केली आहे.

याआधीच्या बिलामध्ये घराचे वार्षिक करयोग्य मूल्य अवाजवी व चुकीच्या पद्धतीने नोंदविल्याचा आक्षेप रहिवाशांचा होता. बांधकाम झालेल्या वर्षातील रेडीरेकनरनुसार वार्षिक करयोग्य मूल्य नोंदवावे तर निवासी विभागाला पाणीपुरवठा हा थेट एमआयडीसीमधून होतो तसेच ड्रेनेजसंबंधी देखभालही एमआयडीसी करते. त्यामुळे पाणीपट्टी आणि इतर लाभकरातून सुटका व्हावी, अशी विनंती त्यांनी केली होती. 

यासंदर्भात डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने सातत्याने केलेला पाठपुराव्यानंतर लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे विशेष बैठक होऊन वाढीव बिले कमी करून सुधारित बिले रहिवाशांना पाठविण्याचा निर्णय नोव्हेंबर महिन्यात झाला होता.  मात्र, दुरुस्त केलेली बिले तीन महिन्यांनी रहिवाशांच्या हाती पडली. परंतु, सुधारित करआकारणी केलेल्या या बिलांमुळे निराशा झाल्याची रहिवाशांची भावना असून महापालिकेपेक्षा ग्रामपंचायतीचा कारभार बरा होता, अशी चर्चा यावर सुरू झाली आहे. दरम्यान, सुधारित बिलांबाबत केडीएमसी प्रशासन आणि लाेकप्रतिनिधींनी पुनर्विचार करावा, अशी मागणी डाेंबिवली वेलफेअर असाेसिएशनने केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली