शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 06:53 IST

निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचे भूमिपूजन केले जात आहेत. पण नंतर पाणी मिळेल याचीही काळजी घ्या, असा टोला म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना चव्हाणांना लगावला.

डोंबिवली : तुम्ही मला प्रत्येक निवडणुकीमध्ये विश्वासाने मतदान करता, यावेळेला फक्त एवढीच विनंती आहे, की जो कमळ चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागरिकांना केले आहे. दरम्यान, महायुतीऐवजी कमळाच्या चिन्हावर उभे राहणाऱ्यांना प्रदेशाध्यक्षांनी निवडून देण्याचे केलेले आवाहन पाहता त्यांनी केडीएमसीची निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आ. रवींद्र चव्हाण यांच्या निधीतून मनसेचे माजी नगरसेवक प्रकाश भोईर, सरोज भोईर यांच्या प्रभागाचा भाग असलेल्या डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रोडवरील अनमोल नागरी ते साईनगर परिसरात १५० मिमी व्यासाची पाइपलाइन टाकण्याचे काम होणार आहे. त्या कामाचा प्रारंभ रविवारी झाला. चव्हाण यांनी यावेळी भारत माता की जय आणि वंदेमातरम, भाजपचा विजय असो अशा घोषणा दिल्या. तसेच प्रकाश भोईरही लवकरच अशा घोषणा करतील, असेही चव्हाण म्हणाले. त्यामुळे भोईर लवकरच भाजपवासी होतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

निधी मागितला, पण दिला नाही : म्हात्रेनगरसेवकाचे काम नगरसेवकांनी करायला हवे ही भावना माझी नेहमीच राहिली आहे. विकासासाठी निधी देणे हे माझे काम, परंतु बाकीचे काम काही नगरसेवकांकडून झाले नाही, असा आरोप चव्हाण यांनी या कार्यक्रमात माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्यावर त्यांचे नाव न घेता केला. याला म्हात्रेंनी प्रत्युत्तर दिले. निधी मागितला पण तो निधी दिला नाही, हे वास्तव आहे. निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचे भूमिपूजन केले जात आहेत. पण नंतर पाणी मिळेल याचीही काळजी घ्या, असा टोला म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना चव्हाणांना लगावला.

भोईर यांची हाताची घडीरवींद्र चव्हाण यांच्या या विधानावर भाष्य करताना प्रकाश भोईर यांनी आतापर्यंत मी जे निर्णय घेतले आहेत, ते कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेतले आहेत. यापुढील निर्णयही त्यांच्याशी चर्चा करूनच घेतले जातील, असे सांगत भाजप प्रवेशाच्या चर्चेवर बोलणे टाळले.

English
हिंदी सारांश
Web Title : Vote for lotus symbol: BJP's Ravindra Chavan hints at solo fight?

Web Summary : Ravindra Chavan urged voters to support the lotus symbol, fueling speculation of BJP contesting KDMC elections independently. Infrastructure projects were launched, sparking criticism from former corporators regarding funding and timing. Discussions surrounding Prakash Bhoir's potential BJP entry continue.
टॅग्स :Ravindra Chavanरविंद्र चव्हाणBJPभाजपाMNSमनसेEknath Shindeएकनाथ शिंदे