शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

एनआरसी वसाहत पाडकामाला पुन्हा विरोध; पाेलिसांसाेबत कामगारांची झटापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 23:57 IST

पाेलिसांसाेबत कामगारांची झटापट : सहा जणांना घेतले ताब्यात

कल्याण : आंबिवली मोहनेनजीकच्या एनआरसी कंपनीच्या कामगारांची थकीत देणी दिलेली नसताना कामगार वसाहतीमधील घरे पाडण्याचे काम सुरू आहे. त्याला शुक्रवारी पुन्हा कामगारांनी विरोध केला. यावेळी काही महिलांनी रस्त्यात लोळण घेत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कारवाईस विरोध करणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता.

एनआरसी कंपनी २००९ पासून बंद आहे. विविध कामगार संघटनांनी मिळून कामगारांची थकीत देण्याचा दावा केला आहे. थकीत देणी जवळपास दाेन हजार ५०० कोटी इतकी आहे. या कंपनीची जागा कंपनी व्यवस्थापनाने अदानी ग्रुपला दिल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनी व अदानी ग्रुप यांच्यातील कराराची वाच्यता व्यवस्थापनाकडून केली जात नाही. कामगारांची थकीत देणी दिलेली नसताना कामगारांच्या वसाहतीतील घरे पाडण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. त्याला कामगारांनी वारंवार विरोध केला आहे. 

आजही कामगारांची घरे पाडण्याचे काम जेसीबी व पोकलेन लावून सुरू असताना ३०० महिला-पुरुषांनी मिळून कारवाईस विरोध केला. यावेळी पोलीस व कामगारांमध्ये झटापट झाली. एनआरसी कामगार संघर्ष समितीचे पदाधिकारी उदय चौधरी यांच्यासह भीमराव डोळस, अशोक नलावडे, सुभाष पाटील, मच्छिंद्र दवते, भूपेंद्र पंत, अजरून पाटील आदींनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन ताब्यात घेण्यात आलेल्या सहा जणांची सुटका केली.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली