शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बुध्द जयंतीच्या मंगलमय पहाटे कल्याण पूर्वेत निघाला कँडल मार्च 

By अनिकेत घमंडी | Updated: May 23, 2024 11:57 IST

 जागृती मंडळाचे आयोजन 

अनिकेत घमंडी, कल्याण : संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुध्द यांच्या जयंती दिनी गुरुवारी कल्याण पूर्वेतील जागृती मंडळ या सेवाभावी संस्थेच्या विद्यमाने कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते .

गेली ४० वर्षाहून अधिक काळ कल्याण पूर्वेत सेवाभावी कार्यात अग्रेसर असलेल्या जागृती मंडळाच्या विद्यमाने इ . सन . १९८४ पासून बुद्ध जयंती दिनी पहाटेच्या मंगलमय वातावरणा कँडल मार्चचे आयोजन करण्यात येत असते या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या कँडल मार्च च्या प्रारंभी जागृती मंडळाच्या कार्यालयात पहाटे बुद्ध धम्म वंदना तसेच त्रिसरण पंचशिलेचे पठण करण्यात आले . या नंतर या कँडल मार्च चा प्रारंभ करण्यात आला . या कँडल मार्चचे नेतृत्व ७१ वर्षाच्या जेष्ठ उपासिका अनुसया काशिनाथ अहिरे यांनी हातात तथागत गौतम बुद्धांच्या बौद्ध धम्माचा पंचशील ध्वज घेवून केले .
हा कँडल मार्च तिसगांव रोड मार्ग पुढे पुणे लिंक रोडने डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी नेण्यात आला . स्मारकावरील  महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर बुध्द वंदना घेण्यात येवून महामानवाला वंदन करण्यात आले . या नंतर हा कॅडल मार्च काटेमानिवली चौकातून पुढे सिध्दार्थ नगर येथे नेण्यात आला . सिध्दार्थ नगर येथील बुद्ध विहारात त्रिसण पंचशील ग्रहण केल्या नंतर या ठिकाणी कॅडल मार्चची समाप्ती खिर दानाने करण्यात आली .

या कँडल मार्च मध्ये आयु . पी. आर. माटे, बाबा थुल, अनिल जांभूळकर आदी जागृती मंडळाचे पदाधिकारी, पंचशिल धम्म प्रबोधन भगिनी मंडळ कल्याण (पूर्व) च्या उपासिका तसेच समाजातील उपासक - उपासिका सहभागी झाल्या होत्या .

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमा