कल्याणमध्ये महापालिकेचा धडक अ‍ॅक्शन मोड! २१ तबेलाधारकांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 18:30 IST2026-05-02T18:29:32+5:302026-05-02T18:30:39+5:30

कल्याणच्या गोविंदवाडी आणि रेतीबंदर परिसरातील २१ तबेलाधारकांवर शेण आणि घाण गटारात सोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Municipal Corporation's action mode in Kalyan! Cases registered against 21 stall holders | कल्याणमध्ये महापालिकेचा धडक अ‍ॅक्शन मोड! २१ तबेलाधारकांवर गुन्हे दाखल

कल्याणमध्ये महापालिकेचा धडक अ‍ॅक्शन मोड! २१ तबेलाधारकांवर गुन्हे दाखल

कल्याण : कल्याण पश्चीमेतील रेतीबंदर आणि गोविंदवाडी परिसरात म्हशीच्या तबेल्यांची संख्या जास्तआहे. या तबेलाधारकांकडून म्हशीचे शेण, मूत्र, उरलेला चारा आदी कचरा परिसरातील गटारातील सोडला जातो. त्यामुळे नागरीकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. या प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने धडक कारवाई करीत म्हशीच्या २१ तबेलाधारकांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. अशा प्रकारची ही धडक कारवाई प्रथमच महापालिकेकडून करण्यात आली आहे. या कारवाईमुळे तबेलाधारकांचे धाबे दणाणले आहेत.

रेतीबंदर आणि गोविंदवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून गटारे तुंबण्याच्या आणि रस्त्यांवर घाण पसरण्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. महापालिकेचे आरोग्य अधिकारी जितेंद्र यादव यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान गोविंदवाडी आणि रेती बंदर परिसरातील तबेला मालक म्हशींचे शेण, मूत्र, घाण आणि इतर कचरा कोणत्याही प्रक्रिया न करता महापालिकेच्या ड्रेनेज लाईन आणि गटारीत सोडत असल्याचे दिसून आले.

यामुळे परिसरातील सांडपाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे सांडपाणी साचण्याचे प्रकार समोर आले. परिमाणी नागरीकांना नाक मूठीत धरुन वावरावे लागत होते. घाण आणि दुर्गंधी पसरवणाऱ्या सर्व तबेला मालकांना यापूर्वीच महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी नोटिसा बजावून कचरा व्यवस्थापनासाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने घनकचरा व्यवस्थापन नियमावलीसह पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी उपायुक्त कोकरे यांच्या तक्रारीच्या आधारे २१ तबेलाधारकांच्या विरोधात सार्वजनिक बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

ज्या तबेलाधारकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले जाणार आहे. न्यायालयात तबेलाधारकांच्या विरोधात खटला सुरू झाल्यावर न्यायालयाकडून त्यांना दंडात्मक रक्कमही आकारली जाऊ शकते. तबेलाधारकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची कारवाई महापालिकेने प्रथमच केली आहे. या कारवाई पश्चात काही तबेलाधारकांनी त्यांच्या तबेला परिसरातील शेण, मूत्र आणि अन्य कचरा स्वच्छ करण्यासाठी जेबीसी मागवून स्वच्छतेला सुरुवात केली असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगितले आहे. मात्र यापूढेही अन्य तबेलाधारकांनी स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर त्यांच्या विरोधातही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Web Title : कल्याण में नगर पालिका का एक्शन: 21 डेयरी मालिकों पर केस दर्ज

Web Summary : कल्याण नगर पालिका ने पशु अपशिष्ट से क्षेत्र को प्रदूषित करने के लिए 21 डेयरी मालिकों के खिलाफ कार्रवाई की। पहले नोटिस जारी किए गए थे, लेकिन उन्हें अनदेखा कर दिया गया। अब, पर्यावरणीय उल्लंघन के लिए पुलिस मामले दर्ज किए गए हैं।

Web Title : Kalyan Municipality Cracks Down: Cases Filed Against 21 Dairy Owners

Web Summary : Kalyan municipality took action against 21 dairy owners for polluting the area with animal waste. Notices were previously issued, but ignored. Now, police cases are filed for environmental violations.

टॅग्स :kalyanकल्याण