डोंबिवलीत कचऱ्याच्या ढीगाला आग! रिजेन्सी अनंतम परिसरात काळ्या धुराचे लोट

By अनिकेत घमंडी | Updated: May 14, 2026 09:53 IST2026-05-14T09:47:02+5:302026-05-14T09:53:50+5:30

डोंबिवली कल्याण शीळ रस्त्यावरील रिजेन्सी अनंतम कॉम्प्लेक्स मधील श्री चैतन्य टेक्नोलॉजी स्कूल जवळ एका मोकळ्या भूखंडावर कचऱ्याला गुरुवारी मोठी आग लागून परिसरात काळा धूर पसरला आहे.

Garbage fire in Dombivli suffocates citizens! Black smoke billows in Regency Anantham area | डोंबिवलीत कचऱ्याच्या ढीगाला आग! रिजेन्सी अनंतम परिसरात काळ्या धुराचे लोट

डोंबिवलीत कचऱ्याच्या ढीगाला आग! रिजेन्सी अनंतम परिसरात काळ्या धुराचे लोट

अनिकेत घमंडी

डोंबिवली: डोंबिवली कल्याण शीळ रस्त्यावरील रिजेन्सी अनंतम कॉम्प्लेक्स मधील श्री चैतन्य टेक्नोलॉजी स्कूल जवळ एका मोकळ्या भूखंडावर कचऱ्याला गुरुवारी मोठी आग लागून परिसरात काळा धूर पसरला आहे. हा कचरा कोणत्या प्रकारचा होता हे समजले नाही पण त्यातून काळा धूर येत असल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत होता. वर्षा महाडिक, योगिता थोटांगे इत्यादी महिला या पहाटे सायकलिंग करण्यासाठी या परिसरात गेल्या असताना त्यांना ही घटना दिसली. त्यांनी केडीएमसी स्वच्छता निरीक्षक याना फोन करून कळविले असून त्यानी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे. 

  जेथे कचऱ्याला आग लागली तेथील भूखंडावर भरणी चालू असून हा कचरा कुठल्या प्रकारचा होता हे समजू शकले नाही आहे. मात्र या कचऱ्याच्या आगीने जवळ राहणारे नागरिक या प्रदूषणाने त्रस्त झाले असून या परिसरात अशा आगी यापूर्वी अधूनमधून लागत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले आहे.

 सदर अशा कचरा सदृश आगीच्या घटनांची चौकशी केडीएमसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने करावी अशी मागणी येथील रहिवाशांनी आणि सायकल सखी ग्रुपच्या महिलांनी केली आहे.

Web Title : डोंबिवली में कचरे के ढेर में आग; काले धुएं का गुबार

Web Summary : डोंबिवली के रिजेन्सी अनंतम के पास कचरे के एक ढेर में भीषण आग लग गई। काले धुएं से निवासी परेशान हैं और बार-बार आग लगने की शिकायत कर रहे हैं। स्थानीय लोग और साइकिल समूह केडीएमसी और प्रदूषण नियंत्रण बोर्ड से जांच की मांग कर रहे हैं।

Web Title : Fire Erupts at Dombivli Dump Site; Black Smoke Plumes Rise

Web Summary : A large fire broke out in Dombivli near Regency Anantam, engulfing a vacant plot filled with waste. Residents are troubled by the black smoke and recurring fires. Locals and cycling groups demand investigation by KDMC and pollution control board.