शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘बालाजी गार्डन’मधील कचरा उचलणे बंद; प्रशासनाने दिली चार दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:04 IST

रहिवाशांची केडीएमसीत धाव : प्रशासनाने दिली चार दिवसांची मुदत

कल्याण : केडीएमसीने १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना स्वत:च कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या घनकचरा विभागाने कोपर परिसरातील ‘बालाजी गार्डन’ सोसायटीचा कचरा उचलणे बंद केले. त्यामुळे तेथील रहिवाशांनी महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात धाव घेतली. या वेळी सोसायटीला चार दिवसांचा वेळ प्रशासनाने दिला आहे. 

‘बालाजी गार्डन’मध्ये नऊ इमारती असून त्यात जवळपास ५२२ सदनिका आहेत. या सोसायट्या वर्षाला ५५ लाख रुपये मालमत्ताकर महापालिकेस भरतात. सोसायटीतील रहिवासी ओला व सुका कचरा महापालिकेच्या घंटागाड्यांमध्ये देतात. मात्र, महापालिकेने दोन दिवसांपासून कोणतीही पूर्व सूचना न देता कचरा उचलणे बंद केले आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत अचानक कचरा उचलणे बंद केल्यास अनारोग्याची परिस्थिती उद्भवू शकते.

सोसायटीत कोणीही आजारी पडल्यास त्याला महापालिका जबाबदार असेल, असा इशारा रहिवाशांनी या वेळी प्रशासनास दिला. महापालिकेकडे न चुकता कर भरूनही महापालिकेकडून कचरा उचलला जात नाही, याकडेही लक्ष वेधले.  घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे म्हणाले, १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांनी त्यांच्या कचऱ्याची स्वत:च विल्हेवाट लावायची आहे.  त्यामुळे कचरा उचलणे बंद केले आहे. आता सोसायटीतील रहिवाशांनी चर्चा केली आहे. सासोयटीने चार दिवसांची मुदत मागून घेतली आहे.

मनसे आमदारांनी  वेधले लक्ष

सोसायटीच्या रहिवाशांसह मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कोकरे यांची भेट घेतली. नागरिक मालमत्ताकर भरत असल्याने त्यांना सर्व प्रकराच्या सोयीसुविधा पुरविणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. अशा प्रकारे अचानक कचरा उचलणे बंद करणे अयोग्य आहे. कचरा उचलला जावा. नागरिकांना गनपॉइंटवर ठेवून काम करता येणार नाही, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसे