शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

‘माहिती अधिकार’ वापरून गुंड झाले ठेकेदार; अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल, छोट्या रकमेची कामे मिळवून घातला धुडगूस

By पंकज पाटील | Updated: July 19, 2025 10:01 IST

नगरपालिका कार्यालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना दोन ठेकेदारांमध्ये झालेली हाणामारीची घटना ही शहरातील राजकीय गुन्हेगारीचाच परिपाक आहे.

- पंकज पाटीललोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : गेल्या पाच वर्षांपासून अंबरनाथ नगरपालिकेत सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीत तयार झालेल्या नव्या ठेकेदारांनी गुंडगिरीला पोसण्याचे काम केले. माहिती अधिकारात अधिकाऱ्यांविरुद्ध माहिती मागवून त्यांना ब्लॅकमेल करायचे व त्यानंतर ठेकेदार बनून नगरपालिकेची कामे मिळवायची, अशी कार्यशैली अंमलात आणून काही गुन्हेगारांचा ठेकेदार म्हणून पालिकेत वावर सुरू होता. अंबरनाथ पालिकेत गुरुवारी दोन ठेकेदारांमध्ये झालेल्या फ्री स्टाइल हाणामारीने हे धक्कादायक वास्तव उघड झाले व पालिकेची प्रतिमा मलिन झाली.

नगरपालिका कार्यालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना दोन ठेकेदारांमध्ये झालेली हाणामारीची घटना ही शहरातील राजकीय गुन्हेगारीचाच परिपाक आहे. याआधी अंबरनाथ पालिकेमध्ये राजकीय वादातून अनेक हत्या घडल्या आहेत. अंबरनाथ शहराला रक्तरंजित राजकीय इतिहास असून, आता नगरपालिकेतील ठेकेदारी हादेखील रक्तरंजित इतिहासाचा भाग झाला आहे. कामे मिळविण्यासाठी एखाद्या ठेकेदाराची हत्या झाली तर कोणालाही नवल वाटणार नाही. 

पुढाऱ्यांचे हस्तक कमाईसाठी सरसावलेप्रशासकीय राजवटीमध्ये अंबरनाथ नगरपालिकेत अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी ठेकेदार म्हणून मिरवू लागले आहेत. ठेकेदार झाल्यावर खूप पैशांची कमाई होते, या आशेवर प्रत्येकजण पालिकेत कोणत्या ना कोणत्या मार्गाने काम मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.  राजकीय पुढाऱ्यांचे हस्तक आता ठेकेदारीतून पैसे कमविण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यातील काही राजकीय पुढारी स्वतः माहितीच्या अधिकाराचा वापर करून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम करीत आहेत. अंबरनाथ पालिकेत आरटीआय टाकून अधिकाऱ्यांना कोंडीत पकडून त्यांच्याकडून कामे मिळवण्याचे प्रकार सुरू आहेत. 

दादागिरी करून फाइल करतात मंजूरअंबरनाथ पालिकेत लहान-मोठ्या कामांसाठी आठ ते दहा लाखांच्या फाइल बनवून त्या परस्पर लाटण्याचे काम सुरू आहे. छोट्या रकमेच्या फाइलचा मोठ्या प्रमाणात वाढला असून, दादागिरी करून त्या फाइल मंजूर करून घेतल्या जात आहेत. अंबरनाथ पालिकेच्या कार्यालयांमध्ये ब्लॅकमेलिंग करणारे गावगुंड उघडपणे अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसून दादागिरी करीत आहेत. अधिकाऱ्यांना चुकांमध्ये पकडून त्यांच्याकडून आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांत अंबरनाथ पालिकेत ठेकेदारांची संख्या वाढल्यामुळे आता पालिकेच्या कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता वाढली आहे. त्यावर नियंत्रण मिळवणे  अवघड जात आहे. काही प्रामाणिक अधिकाऱ्यांना ठेकेदारांची मुजोरी असह्य झाली आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ