स्वतंत्र वेब पोर्टलद्वारे स्व-गणनेचा पर्याय नागरिकांना उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 01:28 IST2026-04-30T01:26:07+5:302026-04-30T01:28:11+5:30
जनगणना ही दोन टप्प्यांत आयोजित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि घरगणना करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्यात लोकसंख्या गणना केली जाणार आहे.

प्रतिकात्मक फोटो...
कल्याण : भारताच्या जनगणना २०२७ चे कामकाजास सुरुवात करण्यात आली आहे. ही जनगणना दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. जनगणनेच्या प्रत्यक्ष क्षेत्रकार्यास प्रारंभ होण्यापूर्वी १ ते १५ मे या कालावधीत स्व-गणनेचा पर्याय नागरिकांना उपलब्ध असणार आहे. या अंतर्गत नागरिकांना स्व-गणना करण्याची सुविधा https://se.census.gov.in या स्वतंत्र वेब पोर्टलद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे पोर्टल १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
जनगणना ही दोन टप्प्यांत आयोजित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि घरगणना करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्यात लोकसंख्या गणना केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि घरगणनेचे क्षेत्रीय कार्य १६ मे ते १४ जून या कालावधीत पार पडणार आहे. त्यानंतर जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्याचा प्रत्यक्ष जनगणनेचा आहे. ही जनगणना १ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत सुरु होणार आहे.
१६ मे ते १४ जून या कालावधीमध्ये कालावधीमध्ये प्रगणक त्यांना नेमून दिलेल्या प्रभागक्षेत्राला भेट देऊन प्रत्यक्ष घरगणना करणार आहेत. घरगणना करीत असताना ते शासनाने ठरवून दिलेले ३३ प्रश्न घरातील प्रमुख अथवा उपस्थित व्यक्तीला विचारुन ती माहिती एचएलओ अँपद्वारे जनगणना पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. जनगणनेची ही प्रक्रिया पूर्णतः डिजिटल असून नागरिकांच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. प्रत्यक्ष घरगणना करण्यासाठी आपल्याकडे येणारे प्रगणक व पर्यवेक्षक यांना आवश्यक ती माहिती देऊन जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमास सहकार्य करावे असे आवाहन कल्याण डाेंबिवली महाालिकेने केले आहे.